esakal | 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित; स्वॅब तपासणीची संख्या वाढतीच 

बोलून बातमी शोधा

44 new corona in 24 hours covid 19 health marathi news}

5 व्यक्ती कोरोना मुक्त ः स्वॅब तपासणीची संख्या वाढतीच 

24 तासात 44 नवे कोरोनाबाधित; स्वॅब तपासणीची संख्या वाढतीच 
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 5 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 293 इतकी झाली आहे. यात शहरात एका दिवसात 33 व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्या आहेत, त्यामुळे वाढत्या कोरोनाची संख्या चिंताही वाढवत आहे. 

गेल्या तिन महिन्यात कोरोना कमी झालेला कोरोना गेल्या दहा दिवसापासून वाढू लागला आहे. यातही शहरातून स्वॅब संकलनाचा जोर अद्यापि कायम आहे. बहुतेक कोरोनाबाधितांच्या संपर्कातील कमीत कमी वीस व्यक्तीचे स्वॅब तपासणीला पाठवले जात आहेत. यावर उलट - सुलट चर्चा सुरू आहे. यात आज रविवार साप्ताहीक सुट्टीचा दिवस असल्याने अपवाद म्हणून स्वॅब संकलनही कमी झाले आहे. जिल्हाभरात सर्व मिळून 254 स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या कमी येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा- पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा ; व्यावसायिकाच्या खूनाचा झाला उलघडा

अशात ग्रामीण भागात आज कोरोना काहीसा नियंत्रणात राहीला आहे. बहुतेक तालुक्‍यात एक दोन बाधित सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण ऍडमीट असणाऱ्यांपैकी 32 व्यक्ती गंभीर आहेत त्यापैकी 16 व्यक्ती व्हेन्टीलेटरवर आहेत. उर्वरीतांची प्रकृती स्थिर आहे. तर शहरातील 86 वर्षीय व्यक्तीचा कोरोना व अन्य गुंतागुंतीच्या आजारामुळे मृत्यू झाला. 

एकूण कोरोना बाधित ः 50 हजार 437 
कोरोना मुक्त ः 48 हजार 400 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 744 
उपचार घेणारे ः 293  

संपादन- अर्चना बनगे