
हा निर्णय जरी ग्रामविकास विभागाने घेतला असला तरी संपूर्ण राज्यात हा निर्णय लागू केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन यावर्षीपासून “स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाणार असल्याची ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा निर्णय जरी ग्रामविकास विभागाने घेतला असला तरी संपूर्ण राज्यात हा निर्णय लागू केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
ना. मुश्रीफ म्हणाले, सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरवलं आहे. महाराजांचा शिवराज्याभिषेक दिनी या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून शिवरायांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रश्न गटाचा आहे, भावकीचा आहे ; आता प्रतिष्ठा लागणार पणाला
जिल्हा परिषदेचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेथील पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित रहातील. कार्यक्रमाला उपस्थितीसाठी प्रसंगी सक्ती केली जाईल, असेही ना. मुश्रीफ यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला जो विचार दिला, जी शिकवण दिली त्याची प्रेरणा जगवण्याचे काम यानिमित्ताने केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम