अबब... ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का?  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

74 year old grandfather gave 12 exam

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, याची प्रचिती देत चौऱ्याहत्तर वर्षीय उद्योजक रवींद्र बापू देशिंगे यांनी आज बारावीची परीक्षा दिली. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात त्यांचा बैठक क्रमांक होता. त्यांनी इंग्रजीचा पेपर आज सोडवला.

अबब... ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का? 

कोल्हापूर : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, याची प्रचिती देत चौऱ्याहत्तर वर्षीय उद्योजक रवींद्र बापू देशिंगे यांनी आज बारावीची परीक्षा दिली. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात त्यांचा बैठक क्रमांक होता. त्यांनी इंग्रजीचा पेपर आज सोडवला. 

हे पण वाचा - नाणार प्रकल्प होणार नाहीच- मुख्यमंत्र्यांचा त्या जाहिरातीवर खुलासा

देशिंगे १९६३ ला दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी‌ सांगली इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यांच्याकडे १९९० पर्यंत विविध गाड्यांची एजन्सी होती. त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण केली. किराणा व औषध दुकानातही त्यांनी काम केले. त्यांची मुलगी स्वाती बी. कॉम., शिल्पा फार्मसी तर मुलगा स्वप्निल बी.एस्सी. पदवीधर आहे. 
नातवंडे शिकत असताना बारावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी २०१७ नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्समध्ये अकरावी करिता प्रवेश घेतला. अकरावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बारावीचा जोरदार अभ्यास केला. मराठी, इंग्रजी व समाजशास्त्र विषयाने त्यांना दगा दिला. या विषयांचा त्यांनी पुन्हा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला. त्यांनी गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयातील खोली क्रमांक एकोणीसमध्ये इंग्रजीचा पेपर सोडवला. 

हे पण वाचा - भिमा -कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही - मुख्यमंत्री

याबाबत देशिंगे यांना विचारले असता ते म्हणाले, "इंग्रजीचा पेपर चांगला गेला. इंग्रजी विषयासह मराठी व समाजशास्त्र विषयाचाही चांगला अभ्यास झाला आहे. त्यामुळे यंदा बारावी उत्तीर्ण होण्यात कसलीच अडचण नाही."