इचलकरंजीत कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे 80 लाख वाया

80 Lakh Wasted By Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News
80 Lakh Wasted By Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून आता सातारा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यामुळे निर्बिजीकरणासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे 80 लाखांची रक्कम वाया जाणार आहे. सलग दोन वर्षे निर्बिजीकरण मोहीम राबविण्यात आली होती; मात्र त्याचे परिणाम दिसत नसल्याने निर्बिजीकरण मोहीम खंडित करण्यात आली; मात्र पुन्हा भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला असून "सातारा पॅटर्न' तरी यशस्वी होणार काय याकडे लक्ष लागले आहे. 

शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे तीन हजार भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांचा उपद्रव नेहमीचाच ठरलेला आहे. रात्रीच्या वेळी तर त्यांची मोठी दहशत असल्याने नागरिक रस्त्यावरून जाण्यास घाबरतात. आयजीएम रुग्णालयातील आकडेवारीनुसार शहर व परिसरात दररोज भटकी कुत्री चावल्याने 25 जण औषधोपचार घेतात. अलीकडे जवाहरनगर परिसरात दोन लहान मुलांचे भटक्‍या कुत्र्यांनी लचके तोडल्याची गंभीर घटना घडली आहे. त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या सभेवेळीही दिसून आले. 

भटक्‍या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. त्यामुळे निर्बिजीकरण हा एकमेव उपाय प्रशासनासमोर आहे. त्यानुसार 2018 मध्ये 2000, तर 2019 मध्ये 2353 कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यात आले आहे. 2020 मध्ये 1630 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. तथापि या मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे कारण सांगून सभागृहाने निर्बिजीकरण करण्याचा प्रस्ताव नामंजूर केला होता. त्यामुळे या मोहिमेवर खर्च करण्यात आलेले 80 लाख रुपये वाया गेल्यात जमा आहेत. सलग पाच ते सात वर्षे ही मोहीम राबविल्यानंतर त्याचा परिणाम दिसतो, असे प्रशासनाचे मत आहे. 

दरम्यान, पुन्हा एकदा भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भटक्‍या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. निर्बिजीकरण मोहीम खंडित करण्यात आली आहे. दुसरीकडे नागरिकांत या प्रश्‍नाबद्दल रोष निर्माण होत आहे. त्यामुळे सातारा पॅटर्न राबविण्याचा निर्णय सभागृहात झाला आहे. यामध्ये भटकी कुत्री पकडून त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. हे काम सातारा येथील एका संस्थेकडून करण्यात येते. त्याची माहिती आता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा पर्याय तरी यशस्वी होणार काय, याकडे लक्ष लागले आहे. 

सातारा पॅटर्नची माहिती घेण्यात येत आहे
सभागृहातील निर्णयाप्रमाणे सातारा पॅटर्नची माहिती घेण्यात येत आहे. या संदर्भातील सर्व नियमावलींची पडताळणी केली जाईल. तांत्रिक बाजू तपासल्या जातील. त्यानंतरच कार्यवाही करण्यात येईल. 
डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी इचलकरंजी. 


आकडेवारी दृष्टिक्षेपात 
भटक्‍या कुत्र्यांची संख्या - सुमारे 3 हजार 
निर्बिजीकरण केलेली संख्या - 4353 
निर्बिजीकरणावरील एकूण खर्च - 80 लाख 
दररोज उपचार - सुमारे 25. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com