कोल्हापुरात पावसाची रिपरिप ; ९ बंधारे पाण्याखाली

सुनील पाटील
Thursday, 24 September 2020

जिल्ह्यात आणखी दोन दिवस जोराचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळपासून उघडीप घेतलेल्या पावसाने दुपारी चारनंतर ठिक़-ठिकाणी जोरदार हजेरी लावली. धरण क्षेत्रातही जोरदार पावसाने झोडपून काढले. राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्‍यानंतर हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातही पावसाने पाणी-पाणी केले. राधानगरी धरणाचे सुरु असलेल्या दोन्ही दरवाजे बंद झाले असून 1400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यात चार दिवसात नद्यांच्या पाणीपातळी फुट ते दोन फुटांनी वाढ झाली आहे. दुपारपर्यंत 3 बंधारे पाण्याखाली होते. तर, धरणक्षेत्रात जोराचा पाऊस असल्याने पाणी पातळीत इंचा-इंचाने वाढ होताना दिसली. आज सकाळी 7 नंतर दुपारी 4 पर्यंत पूर्ण विश्रांती घेतली. अधून-मधून कडक उन्हाचा तडाखाही जाणवला. मात्र चार नंतर जोरदारच्या पावसाने तारांबळ उडवली. सध्या, सोयाबीन कापणी सुरु आहे. चार दिवसापासून होणाऱ्या जोराच्या पावसाचा सोयाबीनवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीन कापणी आणि मळणीची कामे सुरु आहे. सकाळी कापणीचे काम सुरु असेल तर दुपाननंतर कापलेले सोयाबीन पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागते. चार दिवसापूर्वी कापणी केलेले सोयाबीन कडक उन्हात वाळवत घालावे लागते. पण पाऊस किंवा ढगाळ वातावरणामुळे कापलेले सोयाबीन वाळवता आलेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस येणार नाही अशा ठिकाणी मळलेले सोयाबीन पसरवून ठेवावे लागत आहे. कडक उन मिळाले नाहीतर मात्र, भिजल्यामुळे या कोंब येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्ह्यात आणखी दोन दिवस जोराचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात न पडता जिल्ह्यात वेगळवेगळ्या ठिकाणी आणि वेगळवेगळ्या वेळत जोरदाचा किंवा मध्यम स्वरूपचा पडण्याची शक्‍यता आहे. 

हे पण वाचा -  राजू शेट्टींची ७२२७ देतेय साथ देण्याचा संदेश  

पाण्याखाली असणारे बंधारे 
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. 

हे पण वाचा - सतेज पाटील यांच्या ९५९९ ची कार्यकर्त्यांत क्रेझ 

 बंधाऱ्यांची पाणी पातळी  
राजाराम 17.2, सुर्वे 18.8 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 31.9 फूट, नृसिंहवाडी 26.6 फूट, राजापूर 18.6 फूट पाणी आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 dams under water in kolhapur district