नागरिकांच्या तक्रारी वाढल्या, आखरी रस्त्यावरील खड्डे मुजवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गंगावेश ते जामदार क्‍लबपर्यतच्या रस्तेवर खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

कोल्हापूर : गंगावेश ते जामदार क्‍लबपर्यतच्या रस्तेवर खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या रस्त्याची व तेथील अडचणीची पाहणी आज महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व परिसराती स्थानीक नगरसेवक यांनी केली. यावेळी महापौर आजरेकर यांनी गंगावेश ते जामदार क्‍लबपर्यतच्या या आखरी रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश शहर अभियंता यांना दिले. 

महापौर सौ. आजरेकर म्हणाल्या, अमृत योजनेमधून चारशे मीटर मुख्य पिण्याची पाईपलाईन व महापालिका फंडातून सहाशे मीटर ड्रेनेजची लाईन दोन महिन्यात नवीन टाकण्यात याव्यात. पावसाळा सुरु झाल्याने डांबरी रस्ता करता येत नसल्याने तो मोटरेबल करुन द्यावा. पावसाळ्यानंतर चांगल्या दर्जाचा हा रस्ता करावा, अशा सुचनाही शहर अभियंता व जल अभियंता यांना दिल्या. 

यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता भास्कर कुंभार, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उपजल अभियंता एन.एस.सुरवसे, सहाय्यक अभियंता शिवानी नरेवाडीकर, शाखा अभियंता युसूफ भेटेकर, प्रशांत पाटील, शिवानंद बनछोडे, आश्‍पाक आजरेकर, स्थानिक नागरिक रियाज बागवान, राकेश पाटील, सुरेश कदम, सनी अतिग्रे, महेश कामत आदी उपस्थित होते. 

महापौर म्हणाल्या :
- अमृत योजनेमधून मुख्य पिण्याची पाईपलाईन टाकाव्यात
- ड्रेनेजची लाईन दोन महिन्यात नवीन टाकाव्यात
- डांबरी रस्ता करता येत नसल्याने तो मोटरेबल करुन द्यावा
- पावसाळ्यानंतर चांगल्या दर्जाचा रस्ता करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aakhari rasta filling the potholes on the road