आम आदमी तर्फे शिवसेना जाहिरनाम्याची होळी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. 

कोल्हापूर  - वीज बिलात सवलत देण्याचे आश्‍वासने शिवसेनेने जाहिरनाम्यात दिली होती त्या जाहिरनाम्याची होळी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली. येथील शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. 

याबाबत पार्टी तर्फे देण्यात आलेली माहिती अशी की, दिवाळीकाळात 100 युनिट पर्यंतच्या वीज बिलात सवलत देऊ असे आश्‍वासन उर्जामंत्री नितिन राऊत यांनी केले होते. मात्र प्रत्यक्ष सवलत न देता वीज ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम उर्जामंत्री श्री. राऊत यांनी केले आहे. असा ठपका पार्टीने ठेवला. तसेच शिवसेनेन विधानसभा निवडणूक प्रचारात 300 युनिट वीज वापरासाठी 30 टक्के सवलत देणार असेही जाहिरनाम्यात सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात अशी सवलत आज पर्यंत दिलेली नाही. या दोन्ही संदर्भाने शिवसेनेकडून वीज ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप पार्टी तर्फे करण्यात आला यावेळी जाहिरनाम्याची होळी करण्यात आली. 

हे पण वाचा - शंभर दिवसांत आठ लाख 82 हजार घरे बांधणार ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

या आंदोलनात पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई , निलेश रेडकर, उत्तम पाटील, जयवंत पोवार , अमरजा पाटील, संपदा मुळेकर, संतोष घाटगे, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी , लखन काझी आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aam aadmi party protest in kolhapur