महापारेषणमध्ये मेगाभरती : हजारो तरुणांना नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

डॉ. नितीन राऊत; साडेआठ हजार पदे भरणार

कोल्हापूर :  ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीत जवळपास साडेआठ हजार तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे हजारो तरुणांना नोकरीची एक संधी उपलब्ध होणार आहे. 

तांत्रिक संवर्गातील सहा हजार ७५० पदे व अभियंता संवर्गातील एक हजार ७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषणची ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 

मंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर डॉ. राऊत यांनी पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतिबंध सादर करण्याचे आदेशही राऊत यांनी यावेळी दिले.
पूर्वीच्या राज्य वीज मंडळाचे सन २००५ मध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नव्हती. 

हेही वाचा- प्रवासाला जाताय नो टेंशन ; बॅग घ्या भाड्याने -

यांना आहे संधी

आय. टी. आय. 
    उत्तीर्ण विद्यार्थी
  अभियांत्रिकी  
     पदवीधारक

यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. बदलत्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे महापारेषण कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About eight and a half thousand vacancies in technical category in the Mh Transport Company of the Department of Energy