कंटेनरने मागून दिली धडक अन् दुचाकीने घेतला पेट 

अभिजीत कुलकर्णी 
Thursday, 29 October 2020

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एमआयडीसी येथील मनुग्राफ इंडिया या कंपनीसमोर दुपारी दोन वाजता ही घटना घडली. 

नागाव - कंटेनरच्या धडकेने दुचाकीने अचानक पेट घेतला आणि महिलेसह दोघे जखमी झाले. आकाश पाटील ( रा. केखले, ता. पन्हाळा ) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. महिलेचे नाव समजू शकले नाही. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एमआयडीसी येथील मनुग्राफ इंडिया या कंपनीसमोर दुपारी दोन वाजता ही घटना घडली. 

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आकाश पाटील हे कामानिमित्त दुचाकीवरून कोल्हापूरला निघाले होते. शिरोली औद्योगिक वसाहतीतील मनुग्रफ कंपनी जवळ पुण्याहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने मोटरसायकलला मागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकल आडवी होवून रस्त्याला घर्षण होवून पेट घेतला. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष  असे दोघे जण जखमी झाले.  

हे पण वाचा - राज्य शासनाचा निर्णय ; हमीभावानुसार भात खरेदी होणार सुरू 

जखमींना तत्काळ कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस कॉन्स्टेबल पटेकर हे तपास करत आहेत.  

हे पण वाचाआई-वडील शेतात गेल्याची संधी साधून बालिकेवर अत्याचार

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident between two wheeler and contender at kolhapur