कोल्हापूर : गडहिंग्लज - आजरा मार्गावर भीषण अपघात, दोघेजण गंभीर जखमी

accident of cylinder of truck and milk tempo in gadhinglaj and ajara road in kolhapur two people are injured
accident of cylinder of truck and milk tempo in gadhinglaj and ajara road in kolhapur two people are injured

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : गडहिंग्लज-आजरा मार्गावरील अत्याळ (ता. गडहिंग्लज) जवळ गॅस सिलेंडर ट्रक व दूध वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. खबरदारी म्हणून गडहिंग्लज-आजरा मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

गॅस सिलेंडर भरलेला ट्रक गडहिंग्लजहून आजऱ्याकडे जात होता. तर सकाळी विविध गावातून दूध संकलन करुन गडहिंग्लजकडे येत होता. दरम्यान, नंदापाचीवाडी येथील आंबेओहळ ओढ्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याची दोन्ही बाजूला जाऊन उलटली आहेत. गॅस सिलेंडर रस्त्याकडेला पडली आहेत. तर दूधाची कॅन उलटली आहेत. 

अपघातानंतर तातडीने रुग्णवाहीका बोलावून जखमींना उपचारासाठी गडहिंग्लजला पाठविण्यात आले. गॅस सिलेंडर भरलेली असल्याने खबरदारी घेण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचत वाहतूक थांबविली. ती अन्य मार्गाने वळविण्यात आली. येथील पालिकेचे अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. अपघातस्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com