
त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत.
पेठवडगाव (कोल्हापूर) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार पुलाजवळ मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी बाबूराव रघुनाथ पाटील (वय 70, रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारे जावई दीपक शिंदे (वय 38), त्यांची मुलगी सिद्धेश्वरी (वय 8, दोघे रा. बत्तीस शिराळा) गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत.
दीपक शिंदे व त्यांचे सासरे बाबूराव पाटील, मुलगी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी मोटारसायकलने जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर वाठारजवळ मागुन येणारी मोटार (एमएच 10, सीएम 4000) ने कोल्हापूरकडे जाणाऱ्या मोटारसायलकला धडक दिली. यात मोटारसायकलवरील तिघे फरफटत गेले. यामध्ये बाबूराव पाटील यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली.
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे या निवडणुकीला तीनवेळा स्थगिती देण्यात आली होती
याशिवाय मुलगी, दीपक शिंदे जखमी झाले. तिघांना खाजगी रुग्णालयात हलवले. बाबूराव पाटील यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मुलगी व तिचे वडील गंभीर जखमी झाले. या वेळी मोटारचालक जखमींना औषधोपचारासाठी घेऊन गेला मात्र वाटेत रुग्णवाहिकेला बोलावून त्याने पळ काढला. या प्रकरणी दीपक शिंदे (बत्तीस शिराळा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास हवालदार दुकाने करीत आहेत.
संपादन - स्नेहल कदम