esakal | गडहिंग्लजला डबल सीट जाणाऱ्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Action on double seat passengers to Gadhinglaj Kolhapur Marathi News

मोटारसायकलवरून एकाला आणि मोटारीतून दोघांनाच प्रवासाची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आजपासून मोटरसायकलवरून डबल जाणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आज दिवसभरात पंधराहून अधिक डबल सीटचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मोटारसायकलवरील दोघांवरही हा गुन्हा दाखल होत आहे. 

गडहिंग्लजला डबल सीट जाणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : मोटारसायकलवरून एकाला आणि मोटारीतून दोघांनाच प्रवासाची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आजपासून मोटरसायकलवरून डबल जाणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आज दिवसभरात पंधराहून अधिक डबल सीटचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मोटारसायकलवरील दोघांवरही हा गुन्हा दाखल होत आहे. 

पूर्वी विनाकारण वाहन रस्त्यावर येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. त्याबाबत शेकडो गुन्हे दाखल करून 300 वर वाहने जप्तीची कारवाई करण्यात आली. आता जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवर एक आणि मोटारीतून दोनपेक्षा अधिक जणांना प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. यामुळे आजपासून पोलिसांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. वीरशैव बॅंक चौक, दसरा चौकात पोलिस वाहने अडवून कारवाई करीत होते. आज पहिल्याच दिवशी 15 हून अधिक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती. 

मुख्य मार्गावर गर्दी 
दरम्यान, पंधरा किलोमीटरवर असलेल्या कर्नाटकातील संकेश्‍वरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेने प्रभागबंदी केली आहे. प्रत्येक गल्लीतील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. यामुळे पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी येणारी वाहने मुख्य मार्गावरूनच येत आहेत. परिणामी, मुख्य मार्गावर गर्दी जाणवत असल्याने आज पालिकेतर्फे ही गर्दी हटविण्यात आली. 
 

 
 

go to top