
मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभर राबवायला हवा ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
कोल्हापूर : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 'मास्क नाही, प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही, हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम लोकचळवळ म्हणून राबवली पाहिजे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती झाली. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवला पाहिजे. काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढत आहे. यासाठी गृहविलगीकरण आणि गृहअलगीकरणातील बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
हेही वाचा - ज्येष्ठांना इशारा ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 90 टक्के वयोवृद्ध
लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात, असेही ते म्हणाले. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांना लागणारा आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा झाला. राज्य शासनाने टॅंकर उपलब्ध करुन द्यावेत. जिल्ह्यात कोरोनासह इली व सारीच्या रुग्णांची माहितीही संकलित केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या नजिकच्या जिल्ह्यासह सीमा भागातून उपचारासाठी येतात. त्यामुळे फिजिशिएन उपलब्ध व्हावेत. एनआयव्ही, एचएफएन खाटांची क्षमता वाढवून ठेवावी लागेल.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, खासगी कंपन्या, व्यापारी, दुकानदार या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये प्रबोधनाचे होर्डिग्ज लावत आहेत. दुकानदार दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत. सार्वजनिक ड्रेस यंत्रणा, घंटा गाडी यावरुनही मोठ्या प्रमाणात मोहिमेची प्रचार प्रसिध्दी केली जात आहे.
हेही वाचा - सभा तहकूब करण्याएेवजी विषयांना मंजुरी दिली असती तर आनंद झाला असता
यावेळी उपमुख्यामंत्रीचे अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उज्ज्वला माने, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थित होते.
संपादन - स्नेहल कदम
Web Title: Activity Work Kolhapur District Very Correct Appreciation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..