जुनी झाडेच खरे सेलिब्रिटी : अभिनेता सयाजी शिंदे

Actor Sayaji Shinde Say Old tree is a real celebrity
Actor Sayaji Shinde Say Old tree is a real celebrity

कोल्हापूर - ऑक्‍सिजन देणारी जुनी झाडे हीच खरे सेलिब्रिटी आहेत. आपण मात्र नको त्या सेलिब्रिटींच्या मागे धावत बसतो. पर्यावरणाच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी धोरणकर्त्यांनी पावलं उचलली पाहिजेत. त्याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी देशी झाडांची लागवड केली पाहिजे, असे स्पष्ट मत सह्याद्री वनराई वृक्ष चळवळीचे प्रणेते, अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

‘फ्रायडेज फॉर फ्युचर’च्या वतीने जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित ‘ग्रेटाची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रेटाच्या मराठी भाषणाच्या पहिल्या व्हिडिओचेही लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर, ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’चे नितीन डोईफोडे, सिध्दार्थ शिंदे यावेळी उपस्थित होते.

अभिनेते शिंदे म्हणाले, ‘‘शालेय अभ्यासक्रमात पर्यावरणासंदर्भात नुसते धडे देऊन चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावातील मुले वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे काम करतात, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. जुनी झाडे पाहण्यासाठी सहली काढल्या तर मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती होईल. ग्रेटा थनबर्ग नावाच्या नववीत शिकणाऱ्या स्वीडन देशातील मुलीने शाळा बंद आंदोलन पुकारले. ग्रेटाची भाषणे दिशादर्शक आहे. 
दरम्यान, यावेळी योगेश माळी, सविता साळोखे, उमाकांत चव्हाण, महेश शेटे, अरुणा डोईफोडे, धीरज चौगुले, अमोल बुढ्ढे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, तात्या गोवावाला, अमर पाटील, आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

आत्महत्या कशासाठी?
आत्महत्या करून जीवन संपवण्यात काय अर्थ आहे? साध्या कुत्री व मांजरांनाही समजते आत्महत्या करायची नसते. आत्महत्या करण्यापेक्षा कसे जगावे, याची प्रेरणा निसर्गातून मिळते, असेही शिंदे यांनी सांगितले.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com