Womens Day "महाराष्ट्रात लवकरच महिला सुरक्षा कायदा आणणार"

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

आंध्र प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही लवकरच महिला सुरक्षा कायदा आणणार असल्याचे अॅड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित महिला मेळाव्यात अॅड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हापूर - आंध्र प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही लवकरच महिला सुरक्षा कायदा आणणार असल्याचे अॅड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित महिला मेळाव्यात अॅड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

हे पण वाचा - Womens Day खबरदार..! छेडछाड कराल तर... 

आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. कोल्हापुरातही विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा केला जात आहे. महिला दिनाचे आैचित्य साधून येथील तपोवन मैदानावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना अॅड. ठाकूर बोलत होत्या. 

हे पण वाचा - सावधान ; कॉफी शॉपमध्ये जाताय... होईल ही कारवाई

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, " गेल्या काही दिवसात महिलांवरील आत्याचाराच्या अनेक घटाना घडल्या आहेत. यातील हिंगणघाट घटना तर मनाला चटका लाविणारी होती. महिलांवर होणारे आत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे. आंध्र प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही कडक कायदा केला तर अशा घटनांना नक्कीच आळा बसेल. त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच महिसांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा कायदा आणण्यात येईल. वाढत्या आत्याचाराच्या घटनांना वेळीच आळा घातला पाहीजे." 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adv yashomati thakur speech in kolhapur