अन्‌ मायलेकरांना अश्रूंचा फुटला बांध

after lockdown the visit of family court parents and children in kolhapur
after lockdown the visit of family court parents and children in kolhapur
Updated on

कोल्हापूर : तब्बल दहा महिने मुलाने आईचा चेहरा पाहिला नाही. रोज आठवण येत होती, पण काहीच करू शकत नव्हते. अखेर भेटीचा दिवस आला आणि मुलासमोर आई येताच दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला. आपुलकी, माया या शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी डोळ्यांसमोर अनुभवले.

कोरोना लॉकडाउनमुळे कौटुंबिक न्यायालयातील पालकांच्या भेटी बंद झाल्या. त्यामुळे पालक आणि मुलेही अस्वस्थ होती, आता या भेटी सुरू झाल्याचे न्यायालयातून सांगण्यात आले.
घरातील तंटा जेव्हा न्यायालयात येतो, तेंव्हा कायद्यानुसार जावे लागते. समुपदेशन होते. यातून काही समझोते होतात. काही वेळा कौटुंबिक न्यायालयात निवाड्याचे कामकाज चालते. दरम्यानच्या काळात किंबहुना निकालानंतर मुलांना त्यांच्या पालकांना भेटण्यासाठी वेळ दिलेली असते. काहींना दुसरा, चौथा शनिवार सोडून इतर शनिवारी भेट दिली जाते.

कौटुंबिक न्यायालयाची ही कायदेशीर प्रक्रीया आहे. मात्र आई वडिलांचा पटत नाही, म्हणून मुलांचे हाल होतात. तरीही मुलांचा दोघांवरही जीव जडलेला असतो. त्यातूनच मुलांची  भेट देण्याची अट असते. लॉकडाऊनमध्ये न्यायालयाचे कामकाज ही बंद राहिले. कौटुंबिक न्यायालयातील कामकाजावरही परिणाम झाला. पालकांच्या भेटीही बंद झाल्या. कोरोनामुळे वडिलांनीही मुलाला आईकडे सोडले नाही. काही ठिकाणी आईने मुलाला वडिलांकडे सोडले नाही.

पंधरा दिवस, महिना, दीड महिन्यानंतर मुलांना आई-वडीलांची भेट झाली नाही तर काही ठिकाणी आई, तर काही ठिकाणी वडील अस्वस्थ होतात. मुलांनाही आई-वडिलांच्या भेटीची ओढ लागून राहते. हीच ओढ काय असते, ती आता कौटुंबिक न्यायालयात पहावयास मिळत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशन केंद्रातून सांगण्यात आले.

"लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक सेवेत त्या महिला कार्यरत होत्या. त्यामुळे घरोघरी जाऊन इतरांच्या वेदना, कौटुंबिक समस्या त्यांनी जवळून पाहिल्या. आणि आता त्यांनी त्यांच्या आयुष्यातील घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आहे. कोरोना महामारीत काही गोष्टी चांगल्या झाल्या; तर काही गोष्टी आयुष्यावर उठल्याचे आम्ही अनुभवत आहे."

- सुवर्णा भुजबळ, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, कोल्हापूर

"लॉकडाउनमुळे काहींची नोकरी गेली, व्यवसाय बंद होता. जगण्याचा प्रश्‍न होता, अशा वेळी पोटगी कोठून देऊ, असाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. काही महिलांना पोटगी मिळत नाही; तर काहींना वेळेत पैसे मिळत नाहीत. आजही टप्प्याटप्प्याने पोटगी दिली जात आहे. काही मुलांना मिळालेल्‍या व्हिडिओ कॉलिंगच्‍या माध्यमातून भेटी दिल्‍या आहेत. मात्र, सर्वांसाठी ते शक्‍य नव्हते."

- आर. आर. पोंदकुले, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, कोल्हापूर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com