कोल्हापुरातील बांधकाम कामगार काढणार मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

agitation at the office of the Assistant Labor Commissioner on behalf of the Republican Party of India Workers Front
agitation at the office of the Assistant Labor Commissioner on behalf of the Republican Party of India Workers Front

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना कोरोना मदत म्हणून २५ हजार रुपये तत्काळ मिळावेत, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास नऊ नोव्हेंबरला मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी दिला.


कामगारांची जीवनदायी समजली जाणारी मेडिक्लेम योजना बंद असल्याने कामगारांचे जीवन असुरक्षित झाले आहे. सहा महिन्यांपासून बांधकाम व असंघटित  उद्योगातील कामगार बेकारी व उपासमारीने होरपळून जात आहे. कामगारांना हाताला काम नसल्याने दिवाळी साजरी करणे अशक्य आहे. त्यांना दहा हजार रुपये बोनस मिळावा व कोरोनाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दहा लाख रुपये मिळावेत, यासह इतर मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.

दसरा चौक, व्हीनस कॉर्नर ते शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहिला. मोर्चा कार्यालयासमोर आल्यानंतर कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना देण्यात आले.मोर्चात प्रदीप मस्के, अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे, रवी पाटील, समीर कांबळे, खुदबुद्दीन नायकवडी, अनिल जाधव, संजय कोळेकर, पांडुरंग चव्हाण, शरद कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील कामगारांचा समावेश होता.


मागण्या अशा :
- मेडिक्लेम योजना सुरू करा 
- ऑनलाइन नोंदणी बंद करा 
- बांधकाम कामगारांना कोरोना मदत म्हणून पंचवीस हजार रुपये तत्काळ मंजूर करा
- नोंदीत कामगाराला दिवाळीला दहा हजार रुपये बोनस द्या 
-कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दहा लाख विमा संरक्षण द्या 
- पाच हजार रुपये अनुदानाची योजना पूर्ववत सुरू करा 
- घरकुल घरकुल योजनेची अंमलबजावणी करा 
- सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडील लाभांचे पेंडिंग अर्ज त्वरित निकाली काढा
- कोरोना काळात ज्या कामगारांना दोन व तीन हजार रुपये मिळाले नाहीत, त्यांना ते त्वरीत द्या.

 संपादन - अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com