
उजळाईवाडी -कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवार (ता.२० ) ते रविवार (ता. 26) पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, यादरम्यान कोल्हापूर विमान सेवा मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरून हैदराबादसाठी दोन व बेंगलोरसाठी एक अशी विमानसेवा सुरू असून रोज सहा विमानांचे लँडिंग व टेक-ऑफ होत आहे.
संपूर्ण देशभर कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढलेला असल्याने देशांतर्गत नागरी विमान वाहतूक सेवा प्रभावित झाली असून प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. परंतु कोल्हापूर विमानतळावरून विमान प्रवाशांचा प्रतिसाद हा देशातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात चांगला असून प्रत्येक आठवड्यामध्ये प्रवाशांच्या संख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये प्रथमत लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्याच वेळी देशांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तब्बल 60 दिवस कोल्हापूर विमान सेवा स्थगित करण्यात आल्यानंतर 25 मे पासून संपूर्ण देशामध्ये अनलॉक 1.0 ही प्रक्रिया सुरू झाली. 25 मे पासून इंडिगो एअरलाइन्सची हैदराबादसाठी व अलायन्स एअर या कंपनीची बेंगलोर व हैदराबाद या शहरांसाठी दररोजची उड्डाणे सुरू आहेत. या विमानसेवेसाठी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोमवारपासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी ही विमानसेवा मात्र पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार असून यासाठी प्रवाशांनी पोलीस प्रशासनाला ट्रॅव्हल डॉक्युमेंट दाखविणे बंधनकारक आहे. तसेच प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात कोल्हापूर विमानतळावर कोरणा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, निर्जंतुकीकरण, कॉन्टॅक्ट लेस प्रवासाची सुविधा यासारख्या आंतरराष्ट्रीय मापदंड असलेल्या एस ओ पीजचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांपैकी फक्त दोन प्रवाशांचा कोरोणा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हे पण वाचा - कोल्हापूरच्या लाॅकडाऊन नियमात बदल
प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक
कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे तपासणी करण्यात येते. त्यानंतर सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक असून ज्यांना प्रशासनाचे संस्थात्मक विलगीकरण नको आहे अशा प्रवाशांना हॉटेल विलगीकरणचा पर्यायही उपलब्ध आहे.
-सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोकुळ शिरगाव पोलिस
कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार असून विमानसेवा मात्र पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व प्रवाशांनी आपले ट्रॅव्हल डॉक्युमेंट पोलिसांना दाखवणे बंधनकारक असून कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रवाशांनी सहकार्य करावे.
-कमल कुमार कटारिया, संचालक कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण
संपादन धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.