फक्त एका प्रवाशासाठी कोल्हापुरातून केले विमानाने उड्डाण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोल्हापूर विमानतळावरील विमानसेवा आपत्कालीन विमानसेवा वगळता प्रवासी विमान सेवा बंद असून मंगळवार (ता.२४) रोजी विमानसेवा नेहमी सुरू होती.

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळावरून फक्त एका प्रवासासाठी कोल्हापूर ते तिरुपती ही विमानसेवा सुरू ठेवत इंडिगो  एअरलाइन्स व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तिरुपती देवस्थान समितीने भाविकांना तिरुपती दर्शन बंद केल्यानंतर जवळपास सर्वच प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केली. परंतु निर्धारीत तिरुपती कोल्हापूर व कोल्हापूर तिरुपती विमान सेवा इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी फक्त एका महिला प्रवाशाचे तिकीट रद्द न झाल्याने सुरु ठेवली. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्स, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे विमानतळ संचालक कमल कटारिया व कर्मचारी यांनी या नफा तोट्याच्या गणितापेक्षा ग्राहकाभिमुख सेवेसाठी सिव्हिल एव्हिएशन चे डायरेक्टर जनरल विशाल भार्गव व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान बुधवार (ता. २५) पासून कोल्हापूर विमानतळावरील विमानसेवा आपत्कालीन विमानसेवा वगळता प्रवासी विमान सेवा बंद असून मंगळवार (ता.२४) रोजी विमानसेवा नेहमी सुरू होती. मंगळवारी कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद,बेंगलोर या शहरांना विमानसेवा सुरू होती मात्र मुंबईची विमानसेवा बंद होती.कोल्हापुरात यावेळी एकूण २२० प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airplane flight from Kolhapur for a passenger