आजऱ्याच्या राजवर्धनने दिली पंतप्रधानाना मानवंदना 

रणजित कालेकर
Friday, 31 January 2020

आजरा महाविद्यालयाचा राजवर्धन जयसिंगराव देसाई याने प्रजासत्ताक दिनी आरडीसी परेडमध्ये सहभाग दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. त्याने ऑल इंडिया गार्डचा ग्रुप कमांडर म्हणून काम पाहिले. त्याला देशपातळीवर मिळालेल्या सन्मानाने आजरेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला. 

आजरा : येथील आजरा महाविद्यालयाचा राजवर्धन जयसिंगराव देसाई याने प्रजासत्ताक दिनी आरडीसी परेडमध्ये सहभाग दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. त्याने ऑल इंडिया गार्डचा ग्रुप कमांडर म्हणून काम पाहिले. त्याला देशपातळीवर मिळालेल्या सन्मानाने आजरेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला. 

आजरा महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा सिनिअर अंडर ऑफिसर म्हणून राजवर्धन कार्यरत आहे. तो बीएस्सी भाग तीनमध्ये शिक्षण घेत आहे. एनसीसी विभागातील आरडीसी परेडच्या कॅम्पसाठी त्याने घेतलेल्या परिश्रमामुळे निवड झाली होती. कोल्हापूर व पुणे येथे दहा कॅम्प झाले. यामध्ये त्याने यशस्वी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी कॅम्पसाठी 56 महाराष्ट्रचा बटालियनचा एकमेव विद्यार्थी म्हणून त्याची निवड झाली. महाराष्ट्र डायरेक्‍टेडमधून त्याची निवड झाली.

आजरा महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे ऑफिसर ले. डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यापुर्वी 2001 साली याच महाविद्यालयाचा विद्यार्थी सिनिअर अंडर ऑफिसर विजय केसकर याची आरडीसी परेडला निवड झाली होती. अठरा वर्षानंतर या महाविद्यालयाला पुन्हा मान मिळाला आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, संचालकांनी त्याचे कौतुक केले. स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण कार्यक्रमात त्याचे वडील कृषीअधिकारी जयसिंगराव देसाई व आई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajara Mahavidhaylay's Student Rajvardhan Participates In The Parade In Delhi Kolhapur Marathi News