esakal | आजऱ्याचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर 
sakal

बोलून बातमी शोधा

Ajara Nagar Panchayat's Budget approved Kolhapur Marathi News

आजरा नगरपंचायतीचा सन 2020-21 मधील अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसुली व भांडवली जमा असे 18 कोटी 62 लाख 98 हजार 762 रुपये आहे. एकूण खर्च 18 कोटी 59 लाख 9 हजार 469 असून 3 लाख 89 हजार 293 रुपये इतके शिल्लक आहे. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाला मंजूरी घेण्यात आली.

आजऱ्याचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजरा : आजरा नगरपंचायतीचा सन 2020-21 मधील अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसुली व भांडवली जमा असे 18 कोटी 62 लाख 98 हजार 762 रुपये आहे. एकूण खर्च 18 कोटी 59 लाख 9 हजार 469 असून 3 लाख 89 हजार 293 रुपये इतके शिल्लक आहे. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाला मंजूरी घेण्यात आली. यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी अध्यक्षस्थानी होत्या.

दरम्यान, सभेत चौदाव्या वित्त आयोगाच्या अनुदानाची आणि गाळ्यांची चर्चा झाली. मुख्याध्याधिकारी अजिंक्‍य पाटील यांनी स्वागत केले. लेखापाल प्रविण पाटील यांनी सभागृहात अंदाजपत्रक मांडले. सन 2020 -21च्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजुमध्ये नगरपंचायतीला मिळणारे सर्व करांचे उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, शासकीय अनुदाने व इतर बाबीपासून मिळणारे उत्पन्न असे सर्व बाबी अंतर्गत नगरपंचायतीला रुपये 19 कोटी 10 लाख 3 हजार 762 रुपये अपेक्षित उत्पन्न असून 18 कोटी 8 लाख 16 हजार 690 रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे. 
नगरसेविका शुभदा जोशी म्हणाल्या, ""कायदेशीर बाबीवर नगरपंचायतीचा खर्च अधिक होतो, तो कमी करावा.'' प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून वेळेत उत्तर मिळत नाहीत अशी तक्रारही त्यांनी केली.

सर्व नगरसेवकांना अवरत रक्कमेची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले. नगरसेवक अशोक चराटी म्हणाले, ""चौदाव्या वित्त आयोगातून पाच कोटींचे काय केले? याची माहिती द्यावी.'' नगरसेवक संभाजी पाटील म्हणाले, ""नगरपंचायतीचे गाळे किती आणि खोके किती याची माहिती द्यावी. ही शहरातील नागरिकांची फसवणुक आहे.''

अभिषेक शिंपी, यास्मिन बुड्डेखान यांनी सुचना मांडल्या. या वेळी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, विलास नाईक, आनंदराव कुंभार, किरण कांबळे, अस्मिता जाधव, संजीवनी सावंत, सुमैय्या खेडेकर, सीमा पोवार, अनिरुध्द केसरकर, धनंजय पारपोलकर,सिकंदर दरवाजकर यासह नगरसेवक उपस्थित होते.