खासगी भिशीसाठी धोक्‍याची घंटा, भिशी प्रमुख पळून जाण्याचे प्रकार

राजेश मोरे
Saturday, 31 October 2020

कोल्हापूर ः दसरा दिवाळी सारखा सणातील खर्चाचे गणित सोडविण्यासाठी सर्वसामान्यांना गल्लीतील खासगी भिशीचाच आधार असतो. कोरोना संकटाने वसुली न झाल्याने भिशी फुटण्याच्या तोंडावरच चालकच पळून जाण्याचे प्रकार घडू लागले. तसे सभासदांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे विना परवाना भिशीच्या आधारे पठाणी व्याजाची वसुली करणाऱ्या सावकारांच्या चक्रात सर्वसामान्यलोक अडकत आहेत; पण याबाबत तक्रारीचे प्रमाण अत्यअल्प असल्याने कारवाईचे प्रमाणही कमी आहे. 

कोल्हापूर ः दसरा दिवाळी सारखा सणातील खर्चाचे गणित सोडविण्यासाठी सर्वसामान्यांना गल्लीतील खासगी भिशीचाच आधार असतो. कोरोना संकटाने वसुली न झाल्याने भिशी फुटण्याच्या तोंडावरच चालकच पळून जाण्याचे प्रकार घडू लागले. तसे सभासदांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे विना परवाना भिशीच्या आधारे पठाणी व्याजाची वसुली करणाऱ्या सावकारांच्या चक्रात सर्वसामान्यलोक अडकत आहेत; पण याबाबत तक्रारीचे प्रमाण अत्यअल्प असल्याने कारवाईचे प्रमाणही कमी आहे. 

दसरा दिवाळी सणासाठी सर्वसामान्यांकडून खासगी भिशीला पसंती दिली जाते. गल्लोगल्ली असणाऱ्या साप्ताहिक, मासिक, चिठ्ठ्या टाकून अगर लिलाव स्वरुपातील विनापरवाना भिशी सुरू आहेत. बॅंकांच्या तुलनेत थोडे जादा व्याज आणि सणाच्या तोंडावर पैसे मिळत असल्याने व नडीला केवळ विश्‍वासावर कर्जही मिळत असल्याने भिशीला अधिक पसंती दिली जाते. शहरासह जिल्ह्यात काही भिशींची 50 हून अधिक वर्षाची परंपरा आहे. त्यांनी आपला कारभार पारदर्शक ठेऊन सभासदांचा विश्‍वास संपादन केला आहे. जिल्ह्यातील अनेक चालकांनी जिल्हा प्रशासन अगर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेत चांगली भिशी सुरू ठेवली आहे. 
पण गेल्या काही वर्षात विना परवाना खासगी भिशीचे पेव फुटले आहे. त्यात सर्वसामान्य गुंतवणूक करत आहेत. पण गेल्या दोन चार वर्षात भिशी फुटण्याच्या तोंडावर चालकच पळून जाण्याचे प्रकार पुढे येऊ लागलेत. पोटाला चिमटा काढून थोड्या थोड्या रकमेची बचत करून सणासुदीच्या तोंडावर भिशी कधी फुटते, याकडे सर्वसामान्याचे डोळे लागलेले असतात. पण भिशी चालकच पळून गेल्याने मोठे आर्थिक संकट कोसळू लागले आहे. कोरोना संकटात अनेकांच्या हाताचे काम गेले. तशी दिलेल्या कर्जाची वेळेत वसुली होण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे चालक पळून जाण्याचे प्रकार वाढू लागलेत. विना परवाना खासगी भिशींवर तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईचा धडाका सुरू केला होता. पण सध्या तक्रारीचे प्रमाण कमी असल्याने कारवाईचे स्वरुपही थोडे थंडावले आहे. परिणामी वादग्रस्त भिशी चालक बिनधास्त आहेत. 

भिशी आडूनही सावकारी... 
विना परवाना भिशीच्या आधारे काही जण खासगी सावकारी करत आहेत. त्यांच्या पठाणी व्याजाच्या चक्रात अनेकजण अडकून त्यात त्यांचे संसार उद्धवस्थ होऊ लागलेत. तक्रारीनुसार पोलिस यंत्रणेकडून संबधितावर कारवाई केली जाते. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय अशा सावकारांविरोधात गेल्या दीडवर्षात अधिक आक्रमक झाले आहे. संबधित सावकारांच्या घरावर छापे टाकून कागदपत्रे, दप्तर, धनादेश जप्त करत विभागाने 11 जणांवर पोलिसात गुन्हे दाखल केले. 

अवैध सावकारीबाबत दाखल तक्रारीचे स्वरूप 
दाखल दाखल गुन्हे कागदपत्राची छाननी 
35 11 24

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alarm bells for a private bhishi, a type of bhishi director fleeing