सत्तर तासांच्या परिश्रमातून अंबाबाईची सात फूट रांगोळी

संभाजी गंडमाळे
Thursday, 29 October 2020

कोल्हापूर ः राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर यंदा भाविकांना दर्शनासाठी बंद राहिले. मात्र, राज्यभरातील भाविकांनी विविध माध्यमांतून देवीची अनोख्या पद्धतीने सेवा केली. औरंगाबाद येथील कलाशिक्षण घेणाऱ्या आसावरी लिंगाडे हिने घरी सहा बाय सात फुटांची भव्य रांगोळी साकारली त्यासाठी सत्तर तास परिश्रण घेतले. सोशल मीडियावर तिचे भरभरून कौतुक होऊ लागले आहे. 

आसावरी पेंटिंगमध्ये "जीडी' आर्ट करीत असून, ती अभिनव कला महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकते आहे. केवळ छंद म्हणून ती रांगोळीकडे वळली. गणेशोत्सवात चार फूट श्री गणेशाची रांगोळी तिने साकारली आणि नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईची रांगोळी साकारली. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तिची ही रांगोळी तब्बल 70 तासांनंतर पूर्ण झाली. आसावरी सांगते, ""श्री अंबाबाईच्या पूजेचे छायाचित्र पाहिले आणि त्याचक्षणी हीच रांगोळी साकारावी, असे मनोमन वाटले. 70 तासांनंतर ती पूर्ण होताच एक वेगळीच आनंदानुभूती मिळाली.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambabai's seven feet rangoli after seventy hours of hard work