पदवीधरमध्ये चंद्रकातदादांचा वारसदार पुण्याचा की कोल्हापुरचा

निवास चौगले
Wednesday, 28 October 2020

कोल्हापूर ः पुणे पदवीधर विधान परिषद मतदार संघातून सलग दोनवेळा प्रतिनिधीत्त्व केलेले माजी मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांचा वारसदार कोल्हापुरचाच की पुण्याचा असणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. अलिकडेच भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार सोडा, कोल्हापुरातून तुम्हाला पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का ? असा थेट सवाल श्री. पाटील यांना विचारला आहे. त्याला श्री. पाटील कशा पध्दतीने प्रत्युत्तर देतात याविषयीही उत्सुकता आहे. 

श्री. पाटील यांनी सलग दोनवेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व केले. राज्यात 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजपा-सेना युतीची सत्ता आली. पक्षातील ज्येष्ठ, कट्टर कार्यकता या जोरावर श्री. पाटील यांनी महसूलसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद मिळाले. तत्पुर्वी त्यांच्याकडे सहकार, पणन यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचाही कार्यभार होता. 2019 च्या विधानसभा निवडणूक आपण कोल्हापुरातून लढवू शकतो, असेही श्री. पाटील यांनी जाहीर केले होते, प्रत्यक्षात त्यांनी पुण्यातील कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. 
पदवीधर मतदार संघात सद्या राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात लढतच निश्‍चित आहे. राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकीतील उमेदवार सारंग पाटील यांनी माघार घेतल्याने यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? याविषयीही उत्सुकता आहे. त्याहीपेक्षा भाजपाचा उमेदवार हा कोल्हापुरचा असेल की पुण्याचा याची उत्सुकता जास्त आहे. कोल्हापुरात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार होते, श्री. पाटील यांच्या रूपाने पालकमंत्रीपदही कोल्हापुरात होते. पण 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या दोन्हीही आमदारांचा पराभव झाला तर सत्ता बदलल्याने श्री. पाटील यांचेही पालकमंत्री पद गेले. महापालिका आणि जिल्हा परिषदेतील प्रबळ विरोधी पक्ष सोडला तर जिल्ह्यात भाजपचा आमदार, खासदार नाही. दुसरीकडे श्री. खडसे यांच्या रडारवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व श्री. पाटील हे दोघेच आहेत. 

सर्वाधिक मतदार नोंदणी कोल्हापुरची 
सद्यस्थितीत पुणे पदवीधर मतदार संघातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी कोल्हापुरची आहे. त्यामुळे भाजपाचा उमेदवार कोल्हापुरचा असेल तर निवडणुकीत चुरस नक्की असेल. पण श्री. पाटील हे आपला वारसदार पुण्याचा देणार की कोल्हापुरचा हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे, किंबहुना त्यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Among the graduates, Chandrakatdada's heir is from Pune or Kolhapur