आणि बघता बघता खाक झाले 25 लाख

And it turned out to be 25 lakhs
And it turned out to be 25 lakhs

चंदगड (कोल्हापूर) ः येथील आर्या बायोफ्युअल एनर्जी या नैसर्गिक घटकांपासून ज्वलनशील पदार्थ बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामास आज पहाटे आग लागली. बगॅस, सोयाबीन व शेंगांची टलफरे आदी कच्च्या मालाची राखरांगोळी झाली. अग्निशमनच्या दोन बंब, 3 जेसीबी, 2 टीपर, 2 ट्रॅक्‍टर यासह नागरिकांनी सायंकाळी पाचच्या सुमारास आग आटोक्‍यात आणली. 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील माईन्स रोडकडे जाणाऱ्या मार्गावर अनिकेत हळदणकर यांच्या मालकीची ही कंपनी आहे. बगॅस, शेंगांची टलफरे, सोयाबीनची टलफरे, पालापाचोळा आदीपासून इथे इंधन बनवले जाते. जे नैसर्गिक दृष्ट्या कमी प्रदूषण करणारे आणि अधिक ज्वलनशील असते. कारखाने तसेच स्वयंपाकासाठीसुद्धा त्याला मागणी असते. सुमारे सत्तर लाख रुपये खर्चून ही कंपनी उभारली आहे. त्यात 25 लाखाचा कच्चा माल गोदामात होता. पहाटे सहाच्या सुमारास आग लागल्याचे दिसून आले. परंतु तोपर्यंत गोदाम व्यापले होते. गडहिंग्लज व मुरगूड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन स्थानिक नागरीकांनी राबवले होते. बंबात थेट पाणी भरण्याची सोय केल्यामुळे सलग पाण्याचा मारा करणे शक्‍य झाले. सुमारे 25 बंब पाणी फवारणी केली. बगॅस बाजूला करण्यासाठी जेसीबी, टीपर, ट्रॅक्‍टर आदी वाहनांचा उपयोग केला. दोनशे तरुण यासाठी राबत होते. 

बेळगावकडून असहकार्य 
आगीचे स्वरूप पाहून उद्योजक सुनील काणेकर यांनी तातडीने बेळगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला; परंतु त्यांनी मदत करण्यास नकार दिला. गडहिंग्लज व मुरगूड नगरपालिकेने मात्र चांगले सहकार्य केल्याने आग आटोक्‍यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com