आणि पन्हाळ्यावर मोटारीने फाडली कराची पावती

आनंद जगताप
Thursday, 1 October 2020

तब्बल सात महिने बंद असलेले पन्हाळा गडाचे दरवाजे अखेर आज सकाळी उघडले आणि मोठ्या दिमाखात युवक-युवतीच्या जोडीने प्रवासी कराची पावती फाडून गडात प्रवेश केला. पाठोपाठ बारामतीची मोटार आली आणि त्यानंतर कर्नाटकसह परिसरातील दुचाकी-चारचाकींची रांग लागली. दुपारी बारापर्यंत कर्मचाऱ्यांनी दीड हजारच्या आसपास कर गोळा केला. कालपर्यंत जे नाक्‍यावरील कर्मचारी पन्हाळा बंद आहे परत जा, असे ओरडून सांगत होते तेच कर्मचारी आज गाड्या थांबवून साहेब, प्रवासी कर आहे, पावती घ्या, नि मग जा, असे अजीजीने सांगत होते.

पन्हाळगड

पन्हाळा ः तब्बल सात महिने बंद असलेले पन्हाळा गडाचे दरवाजे अखेर आज सकाळी उघडले आणि मोठ्या दिमाखात युवक-युवतीच्या जोडीने प्रवासी कराची पावती फाडून गडात प्रवेश केला. पाठोपाठ बारामतीची मोटार आली आणि त्यानंतर कर्नाटकसह परिसरातील दुचाकी-चारचाकींची रांग लागली. दुपारी बारापर्यंत कर्मचाऱ्यांनी दीड हजारच्या आसपास कर गोळा केला. कालपर्यंत जे नाक्‍यावरील कर्मचारी पन्हाळा बंद आहे परत जा, असे ओरडून सांगत होते तेच कर्मचारी आज गाड्या थांबवून साहेब, प्रवासी कर आहे, पावती घ्या, नि मग जा, असे अजीजीने सांगत होते.

पन्हाळगड गच्च हिरवाईने नटलाय, फुलारलाय, पक्ष्यांनी चिवचिवाट मांडलाय; पण हे अनुभवायला पन्हाळकरांशिवाय कुणीच नव्हतं. कोरोनामुळे गडाचे दरवाजे मार्चपासून बंद होते, पर्यटक सरावाने दररोज विशेषतः शनिवारी, रविवारी उत्साहात यायचे; पण नाक्‍यावर अडवले जायचे. कोल्हापूर चालू मग पन्हाळा बंद का? यावरून भांडण व्हायचे, पोलिसांनी मध्यस्थी करायची, नि मग लोक चार दरवाजातील दरडीवरून चढून तटबंदीवर फोटोसेशन करू लागले, सेल्फी काढू लागले, धोका होऊ नये, म्हणून प्रशासनाने नाका परिसरात गाड्या थांबवणेच बंद केले आणि घरात थांबून वैतागलेले पर्यटक हिरमोड होऊन परत लागले.

गतवर्षी गडावर येणारा मुख्य रस्ता खचल्याने चार महिने पन्हाळा बंद होता, केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील छोट्या मोठ्या हॉटेल, हातगाडी वाले, गाईड यांचा बसलेला धंदा कोरोनामुळे आणखी बसला आणि खायचे वांदे झाले म्हणून अखेर या व्यावसायिकांनी अखेर चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा रूपाली धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची भेट घेऊन कैफियत मांडली आणि प्रशासनानेही विचार करून काही अटींवर आजपासून पन्हाळा खुला केल्याची घोषणा केली. शासनानेही 5 ऑक्‍टोबरपासून काही अटींवर हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिल्याने गडप्रेमींना हायसे वाटले आहे, नगरपरिषदेचा या कालावधीत लाखो रुपयांचा प्रवासीकर बुडला असला तरी पन्हाळा बंद करून प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध केला आहे 

ऐतिहासिक वास्तू बंद 
पन्हाळगड जरी सुरू झाला असला तरी येथील सदर इ महल, अंधारबाव, अंबरखाना या ऐतिहासिक इमारती बंदच आहेत, पुरातत्त्व खात्याच्या परवानगीशिवाय त्या खुल्या होणार नाहीत. त्यामुळे पर्यटकांना केवळ तटबंदीवर फिरत मोकळी हवा चाखत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा लागणार आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And the tax receipt torn by the car on the panhala