बदलीच्या हक्कासाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

अंगणवाडी सेविकांना बदली मागण्याचा हक्कच शासनाने दिलेला नाही

कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचा हक्क मिळावा, यासाठी शहरातील चार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरीतील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. अंजनी रामचंद्र गोंधळी, माया प्रकाश पोवार, इंदुमती तानाजी ठोंबरे व मधुरा सुहास लोकरे यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

अंगणवाडी सेविकांना बदली मागण्याचा हक्कच शासनाने दिलेला नाही. त्यामुळे घरापासून लांब असणाऱ्या अंगणवाडीत काम करताना त्यांचा प्रवासात वेळ व पैसा खर्च होतो. तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस या स्थानिक रहिवासी असाव्या, या नियमाच्या विरोधात त्यांची नेमणूक आहे. शासन आता पदोन्नतीने रिक्त जागा भरणार आहे. पण तत्पुर्वी शक्‍य त्या बदल्या होऊन अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

हे पण वाचाधक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

अंगणवाडी सेविकांना विवाहानंतर त्यांच्या पतीच्या गावापासून दोन किमी अंतरात रिक्त जागा असल्यास तेथे बदलीचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच विधवा, परितक्‍त्या यांना देखील बदली आवश्‍यक बनते. त्यांना बदलीचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच पुर्वी बालवाडीतून अंगणवाडीत समायोजित केलेल्या महिलांना त्यांच्या गावापासून दुर काम मिळाले. अशा अंगणवाडी सेविकांना गावातील अंगणवाडीत रिक्त जागा असल्यास बदली मिळावी, या मागण्या अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी केल्या आहेत. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi worker protest in kolhapur