"पालकमंत्री बदलणं म्हणजे पंपावरला माणूस बदलण्याइतकं सोप नाही"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

खासदार धनंजय महाडिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर

कोल्हापूर : पालक मंत्री बदलणे म्हणजे पंपावरला माणूस बदलने नाही, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. निष्क्रिय पालकमंत्री सतेज पाटील यांना हटवून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी महाडिक यांनी पत्रकाद्वारे केली होती. त्याला आज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. 

हेही वाचा - राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले...

राजकारणात आंदोलनं होत असतात. माझेही कार्यालयावर दोन दिवसापूर्वी आम आदमी पार्टीचे आंदोलन झाले. म्हणून मी काय राग व्यक्त केला नाही. राजकारणात हे सर्व खिलाडू वृत्तीने घ्यायचे असते पण महाडीक यांना राजकारणाची समज नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला. माजी खासदार धनंजय महाडिक गेली पाच वर्ष किती सक्रिय होते हे जनतेनं पाहिल आहे. म्हणूनच आता ते निष्क्रिय आहेत अशी टीकाही पालकमंत्री सतेज पाटील यानी केली. 

हेही वाचा -  कोल्हापूरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आपल्या लहान मुलांसह चार कुटुंबांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न...

खासदारकी जाऊनही महाडिक यांनी दिल्लीतील त्यांचा बंगला सोडलेला नाही. यावरून त्यांची कार्यपद्धत स्पष्ट होते. त्यांची टीकेची पातळी पाहता माजी खासदार महाडिक यांना राजकारणाची समज नसल्याचा टोलाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. ज्यांना स्वतःचा कारखाना चालवता येत नाही, त्यांना भाजपने साखर तज्ञ म्हणून समितीवर घेतलंय हे हस्यास्पद अशी खरमरीत टीकाही सतेज पाटील यांनी केली.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: answer on the dhananjay mahadik question by guardian minister satej patil