esakal | अमिताभ बच्चन यांच्याकडून कोल्हापुरच्या अवनि संस्थेस ११ लाख रुपयांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Anuradha Bhosle of Avani in Kaun Banega Crorepati digital platform

११ लाखांची मदत; कार्यावरील खास भाग शुक्रवारी

‘कौन बनेगा करोडपती’त ‘अवनि’च्या अनुराधा भोसले

अमिताभ बच्चन यांच्याकडून कोल्हापुरच्या अवनि संस्थेस ११ लाख रुपयांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘लॉक किया जाय’ म्हणत खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोल्हापुरातील अवनि संस्थेला स्वतःकडील ११  लाख रुपयांची मदत केली. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाद्वारे अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांचे जीवनचरित्र शुक्रवारी (ता. २०) सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.


बालहक्क दिनाच्या निमित्ताने ‘कर्मवीर’ या खास भागामध्ये भोसले यांचा जीवनसंघर्ष, बालकामगारविरोधी चळवळ दाखविली जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणारी अवनि ही कोल्हापुरातील पहिली संस्था आहे. तब्बल साडेचार तासांच्या चित्रीकरणातून तयार झालेला दोन तासांचा भाग रात्री नऊ ते अकरा या वेळेत प्रसारित होणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा खास शैलीतील ‘लॉक किया जाय’ हा ‘कौन बनेगा करोडपती’ मालिकेतील डायलॉग प्रसिद्ध आहे. याच मालिकेत कोल्हापुरातील अवनि संस्थेच्या सर्वेसर्वा अनुराधा भोसले यांची निवड केली. ३० ऑक्‍टोबरला याचे चित्रीकरण मुंबईतील स्टुडिओमध्ये झाले.

हेही वाचा- कोरोनामुक्तीचे साकडे: श्री अंबाबाई दर्शनासाठी तीन दिवसांत २५ हजारांवर भाविक; यांना प्रवेश नाही -

भोसले यांच्या सोबत सेलिब्रेटी म्हणून दिग्दर्शक नागनाथ मंजुळे आहेत. भोसले यांच्या जीवनातील अडथळ्यांची शर्यत आणि त्यातून अवनि संस्थेच्या माध्यमातून बाल कामगारविरोधी चळवळ, बाल हक्क, बाल शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा मालिकेत घेतला आहे. भोसले यांची धडपड ऐकून खुद्द अमिताभ बच्चन यांनी अकरा लाख रुपये संस्थेला मदत दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कोल्हापुरात येणार असल्याचेही सांगितले. येथे झालेल्या प्रश्‍नोत्तरात तब्बल २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्याचेही भोसले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

संपादन- अर्चना बनगे