निपाणीत पाच शासन नियुक्त नगरसेवकांची नियुक्ती

Appointment of five government appointed corporators in Nipani
Appointment of five government appointed corporators in Nipani
Updated on

निपाणी (बेळगाव) :  येथील नगरपालिकेसाठी ५ शासन  नियुक्त नगरसेवकांची नियुक्ती झाली असल्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी गुरुवारी (ता. ५) रात्री केली. दीपक मलगोंडा पाटील, दत्तात्रय सखाराम जाेत्रे, उदय मनोहर नाईक, सोनाली अमर उपाध्ये, दादाराजे सिद्धाेजीराव देसाई-निपाणकर अशी शासननियुक्त नगरसेवकांची नावे आहेत. नियुक्त नगरसेवकांच्या उपस्थितीत मंत्री जोल्ले या  भिवशी येथील निवास्थानी बाेलत हाेत्या. 


मंत्री जाेल्ले म्हणाल्या, 'नुकतेच निपाणी पालिकेवर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. आता पाच शासन नियुक्त नगरसेवकांची नियुक्ती देखील झाली आहे. तसे पत्र नगरविकास खात्याकडून उपलब्ध  झाले आहे. सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत ही नियुक्ती असणार आहे. राज्य व केंद्रात भाजपची सत्ता आहे. शिवाय आपण मंत्री तर  अण्णासाहेब जाेल्ले हे खासदार आहेत.

नगरपालिका देखील भाजपकडे आल्याने निपाणीच्या शहर विकासाला गती येणार आहे. शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून जास्तीत जास्त विकासनिधी आणून देण्यासाठी आपण व खासदार जाेल्ले  दोघेही प्रयत्नशील राहू. नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह  सर्व नगरसेवक व शासन नियुक्त नगरसेवकांनी जनतेचा विश्वास कामाच्या माध्यमातून सार्थकी लावावा. आवश्यक तेथे आपले नेहमी सहकार्य राहील.'


खासदार अण्णासाहेब जाेल्ले यांनी, शासन नियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शासन नियुक्त नगरसेवकांनी आपल्या निवडीसाठी प्रयत्न केल्याबद्दल मंत्री जाेल्ले, खासदार जाेल्ले  यांचे आभार मानले. दत्तात्रय जाेत्रे यांनी, मंत्री जाेल्ले, खासदार जाेल्ले  यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहणार अशी शासन नियुक्त नगरसेवकांच्या वतीने ग्वाही दिली. यावेळी  नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष निता बागडे,  शहर भाजप अध्यक्ष प्रणव मानवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com