कोल्हापूर शहरात थेट गॅसपाईपलाईनच्या खोदाईस मंजुरी

Approval for excavation of direct gas pipeline in Kolhapur city
Approval for excavation of direct gas pipeline in Kolhapur city

कोल्हापूर : गॅस पाईपलाईन टाकताना खोदाई केलेला रस्ता त्वरित दुरुस्त करुन देण्याच्या अटीवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत उपसुचनेसह मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या खोदाईच्या दराने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे शुल्क भरणे पवडत नसल्याचे कंपनीने कळविले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.
सत्यजित कदम, शारंगधर देशमुख म्हणाले, ""प्रस्तावाला कधीही विरोध नव्हता. मात्र, यापूर्वी ठेकेदारांनी खोदाई केल्यानंतर रस्ता नव्याने केला नसल्याचा अनुभव आहे. या प्रकल्पात रस्त्यांची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे. काम झाल्यानंतर खोदाई झालेला रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा, हीच सर्व सदस्यांची भूमिका आहे.''अशोक जाधव यांनी पाच वर्षात ठेकेदारांनी अशा प्रकारे खुदाई केली. मात्र, रस्ते नव्याने केले नाहीत. यामुळे अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आणले. कदम म्हणाले, ""हा प्रकल्प लोकांच्या फायदासाठी असून, व्यावसायिक उद्देश नाही. त्यामुळे खोदाई दरावरुन काम रखडले म्हणून महापालिकेचे बदनामी होवू नये.'' कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना त्वरित भरपाई द्या, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करावी, अशी सूचना सदस्य प्रा. जयंत पाटील यांनी केली. नकाते म्हणाले, ""स्मशानभूमीतील मृत कर्मचाय्राच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी.'' विजय सूर्यवंशी यांनी विम्याची रक्कम मिळण्यास विलंब का होत आहे, असा सवाल केला. 

उत्पन्न वाढीसाठी नवे मार्ग शोधा 
महापूर, कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्नात कोट्यवधीची तूट आली आहे. पूढील पाच महिन्यांत वसुली कशी करणार, असे प्रा पाटील यांनी विचारले. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com