शेतकऱ्याच्या मुलाने मिळविली गुवाहाटी आयआयटीकडून 'ही' पदवी

शेतकऱ्याच्या मुलाने मिळविली गुवाहाटी आयआयटीकडून 'ही' पदवी

चंदगड : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील प्रा. गुंडोपंत पाटील यांनी गुवाहाटी आयआयटी विद्यापीठाची पीएचडी पदवी संपादन केली आहे. पुणे येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले. दुर्गम खेड्यातील प्रा. पाटील यांचे हे यश डोंगराएवढे मोठे आहे. 

प्रा. पाटील यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले. पाचवी ते सातवीपर्यंत आमरोळी, नववीपर्यंत अडकूर, तर दहावीची परीक्षा नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमधून उत्तीर्ण केली. गडहिंग्लज येथील साधना कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. सिव्हील पदवी मिळवली. बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम.ई.ची. पदवी संपादन केली. त्यानंतर ते पुणे येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

शेतकरी कुटुंबातील पाटील यांचा हा शैक्षणिक आलेख प्रेरणादायी आहे. एका दुर्गम छोट्या गावातून त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढी मजल मारली आहे. अध्यापनातील कौशल्याबद्दल त्यांना 1999 ला इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसचा बेस्ट सिटिझन ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, पीएचडीसाठी त्यांनी "इव्हॅल्युशन ऑफ स्लोप बॉटम ट्युन्ड लिक्वीड डॅम्पर्स इन रिडक्‍शन ऑफ अर्थक्वीक व्हायब्रेशन ऑफ स्ट्रक्‍चर' हा विषय निवडला होता. गुवाहाटी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेने त्यांच्या शोधनिबंधाला मंजुरी दिल्यामुळे पोरेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रा. पाटील यांना प्रा. के. डी. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com