कोल्हापुरच्या वीर पुत्राला अखेरचा सलाम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

मात्र या दुर्दैवी बहीणीवर ऋषीकेश यांच्या पार्थिवाला ओवाळाव लागलं.

कोल्हापूर ( बहिरेवाडी) : आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शत्रूशी लढताना वीरमरण आलेला पुत्र आज अनंतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये शत्रूच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले. आज त्यांच्या गावी त्यांना भडाग्नी देण्यात आला.

ऋषीकेश यांचे पार्थिव आज पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झाले. कोल्हापूरमध्ये मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मुळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला. अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाच अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रुंचा बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला. अंतयात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. 

हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून ‘प्रशासकराज’ ; आयुक्तांकडे असणार सर्वाधिकार -

याठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक,समरजीतराजे घाटगे, माजी आमदार संजय घाटगे,  जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून  मानवंदना देण्यात आली. यावेळी भारत माता की जयचा जयघोष झाला.

भाऊबीजे दिवशी पार्थिवाला ओवाळले

आज भाऊबीज असल्याने सर्वत्र बहीण भावाला ओवाळते. हुतात्मा ऋषीकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे. मात्र या दुर्दैवी बहीणीवर ऋषीकेश यांच्या पार्थिवाला ओवाळाव लागलं. हा प्रंसग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: army officer rushikesh jondhale exequies in his home town ajara bahiravadi in kolhapur