इचलकरंजीतील 11 जणांना अटक

पंडित कोंडेकर
Thursday, 10 December 2020

येथील जुना चंदू रोडवरील भोजे मळ्यातील ऍटोलूम कारखान्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण तपास करीत 11 संशयितांना अटक केली आहे. हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पत्रकारांना सांगितले. 
 

इचलकरंजी ः येथील जुना चंदू रोडवरील भोजे मळ्यातील ऍटोलूम कारखान्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण तपास करीत 11 संशयितांना अटक केली आहे. हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पत्रकारांना सांगितले. 
अटक केलेल्यांची नावे अशी- वैभव बापू घोरपडे, सूरज परशराम घोरपडे, नीलेश अनिल कोळी, महेश दीपक सूर्यवंशी, पंकज पांडुरंग शिंदे, प्रथमेश ज्योतिराम चव्हाण, गौरव भाऊसाहेब नरवाडे, मयूर शिवाजी शिंदे (सर्व रा. काडापुरे तळ परिसर), दीपक मारुती धुमाळ (चिंचली गल्ली), सौरभ महादेव गंदूगडे (मंगळवार पेठ), संदीप सुभाष सूर्यवंशी (षटकोन चौक). 
संशयितांनी चेहऱ्यावर कापड बांधून 30 नोव्हेंबरला रात्री ऍटोलूम कारखान्यावर हल्ला करून कामगारांना मारहाण केली होती. यामध्ये 12 ऍटोलूमचे मशिन डिस्प्ले व ऑपरेटर पॅनल यांची नासधूस केली होती. त्यामुळे तब्बल 30 लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार महावीर मनोहर भोजे (काडापुरे तळ) यांनी दिली होती. 
सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली, शिवाजीनगरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीमधील फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये हल्लेखोरांच्या हालचाली टिपल्या. त्यामध्ये वापरलेल्या वाहनांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. पोलिसांनी यामध्ये तब्बल 11 संशयितांना अटक केली. सर्वांना आज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

मास्टरमाईंडचा शोध 
कारखान्यावरील हल्ला कोणत्या कारणासाठी झाला, हे स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस उपअधीक्षक महामुनी यांनी सांगितले. ते खंडणीसह अन्य कारणांचा शोध घेत आहेत. येत्या एक - दोन दिवसांत कारण स्पष्ट होईल, असे श्री. महामुनी यांनी सांगितले. यातील मास्टर माईंडचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest five person