ब्रेकिंग - कोल्हापुरात पोलिस निरीक्षकावर हल्ला 

attack on police in kolhapur
attack on police in kolhapur

कोल्हापूर - कोल्हापुरात पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (दि. २८) पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षकावर हल्ला करण्यात आला आहे. वसंत बाबर असे हल्ला झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. 

अतिक्रमण काढण्यास विरोध करत एका विक्रेत्याने शहर वाहतूक शाखे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला शिवीगाळ केली. बिंदू चौक सबजेल रस्त्यावर आज हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबधिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आज सकाळ पासून महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली होती. पंडित पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू होती. पथकाने सीपीआर चौक ते भाऊसिंगजी रोडवरील रस्त्यावरील दुकाने, फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हे पथक करवीरनगर वाचन मंदीर ते बिंदू चौक सबजेल रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले. त्यावेळी रस्त्यावर मांडलेल्या वस्तू हटवत असताना एका विक्रेत्याने त्याला कडाडून विरोध केला. त्यांने थेट महापालिका पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याही त्याने उद्धट वर्तन करत धक्काबुक्‍कीचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी रोकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसात कोल्हापुरात पोलिसांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अशा भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. 

अतिक्रमण काढताना बिंदू चौक सबजेल परिसरातील एका विक्रेत्यांने महापालिका पथकासह आपल्याशी उद्धट वर्तन केले. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

-पोलिस निरीक्षक वसंत बाबर (शहर वाहतूक शाखा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com