ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला

दत्ता वारके
Tuesday, 12 January 2021

ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये वाद झाला

बिद्री : येथील साखर कारखान्याची मळी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरुन कारखाना हद्दीत दोघा ट्रॅक्टरचालकांमध्ये वाद झाला. यातून तरुणावर कात्रीने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. उदय उत्तम चौगले ( वय २५ , रा. बिद्री ) असे यामध्ये जखमी झालेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. तर आरोपी हा अल्पवयीन असून त्याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मळी वाहतूक करण्यासाठी उदय चौगले व संशयित आरोपी हे दोघेजण आपले ट्रॅक्टर घेऊन रांगेत थांबले  होते. यावेळी ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये वाद झाला. यातूनच संशयिताने कात्रीने उदयच्या डाव्या कानाच्या मागे, पाठीत तसेच छातीवर वार केले. यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागेवर कोसळला. नातेवाईकांनी जखमी उदयला तातडीने कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून जागेचा पंचनामा केला. यातील संशयित आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून तो अत्पवयीन असल्याचे समजते.

हे पण वाचाधक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

 घटनेचा तपास मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुमार ढेरे, बीट अंमलदार प्रशांत गोंजारे करित आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on traktor driver kolhapur bidri