esakal | कोल्हापुरात पोलिस अधीक्षक कार्यालयातील पार्किंगमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न 

बोलून बातमी शोधा

Attempted self immolation in parking Superintendent of Police office in Kolhapur}

राज्य उत्पादन शुल्क विभागात त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने वैतागून हे पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला

कोल्हापुरात पोलिस अधीक्षक कार्यालयातील पार्किंगमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न 
sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर - पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्कींगमध्ये अंगावर पेट्रोल ओतून एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखले. भिमराव बाजीराव करवते (वय 48, रा. गोकुळ शिरगाव) असे त्यांचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने वैतागून हे पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला. याबाबत कारवाई करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिमराव करवते हे गोकुळ शिरगाव येथे राहतात. त्यांच्या मालमत्तेबाबत भावकीत वाद आहे. याच एका मालमत्ते संदर्भातील त्यांनी दोन महिन्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली न गेल्याने ते आज सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. येथील पार्किंगच्या ठिकाणी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार महिला पोलिस कर्मचारी सुनिता गवस, रुपाली जोंधळे यांच्यासह वाहतूक पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी करवते यांना वेळीच रोखले. त्यानंतर त्यांना शाहूपुरी पोलिसात आणले. याबाबत कारवाई सुरू असल्याचे पोलिस कर्मचारी सुहास पोवार यांच्याकडून सांगण्यात आले. 
 
 
  संपादन - धनाजी सुर्वे