‘लक्ष असू द्या’ म्हणत चाय पे चर्चा, थेट मतदाराच्या घरात!

to attract a voters tricks from candidate in kolhapur district for grmpanchayt election
to attract a voters tricks from candidate in kolhapur district for grmpanchayt election
Updated on

गडहिंग्लज (कोल्हापूर) : राजकारणात 'चाय पे चर्चा' हा ट्रेंड भलताच प्रसिद्ध झाला. तो कोणी केला, का केला याला फारसे महत्व न देता गरजेनुसार त्याचा वापर सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही तो उपयोगी ठरताना दिसतो. उमेदवारी निश्‍चित असलेले आतापासूनच कामाला लागले आहेत. प्रभागातील प्रभावशाली व्यक्ती, अधिक मतदारसंख्या असलेल्या कुटुंबांच्या घरी पायधूळ झाडत आहेत. यानिमित्त चाय पे चर्चा रंगत आहे. आपल्या उमेदवारीबाबत अप्रत्यक्षपणे सकारात्मक वातावरण निर्माण करतानाच ‘लक्ष असू द्या’चे आर्जव सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. जिल्ह्यातील ४३३ गावे निवडणुकांना सामोरे जात आहेत. ग्रामपंचायतीवर आणि पर्यायाने गावावर सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. स्थानिक आघाड्यांची रचना करण्यात गावपुढारी गुंतले आहेत. काही अपवाद सोडले तर ही प्रक्रिया माघारीपर्यंत सुरूच राहणार आहे. सर्वसाधारणपणे माघारीच्या टप्प्यात आघाड्यांच्या अंतिम रचनेनुसार उमेदवारी निश्‍चित होईल. त्यानंतरच प्रचाराचा आणि पर्यायाने निवडणुकीचा खरा 
रंग दिसू लागेल. 

मात्र, गावच्या राजकारणातील प्रभाव, प्रभाग आरक्षणाचे पडलेले योग्य फासे यामुळे अनेकांची उमेदवारी आधीच निश्‍चित आहे. त्यांनी प्रचाराचे वेगळेच तंत्र अवलंबले आहे. सकाळ, सायंकाळच्या सत्रात आपल्या प्रभागातील थेट मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यासाठी समाजातील इतरांवर प्रभाव असणाऱ्या व्यक्ती, अधिक मतदार संख्या असणारी कुटुंबे हेरली जात आहेत. 

पाहुणचार म्हणून अगत्याने विचाराला जाणारा चहा घेतच त्यांच्या मनात साखरपेरणी सुरू आहे. गावासाठी किती खस्ता खाल्या यापासून होणारी सुरवात आपल्या उमेदवारीच्या योग्यतेपर्यंत पोचत आहे. निरोप घेताना लक्ष असू द्या... म्हणून सांगायला विसरत नाहीत, हे विशेष. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com