"भुविकास'च्या थकबाकीसाठी जमीनीबरोबर आमचाही लिलाव करा

निवास चौगले
Tuesday, 2 March 2021

कोल्हापूर ः माझ्या नावांवर 72 लाखाचे कर्ज आहे, मात्र शेतात पाण्याचा थेंबही पडलेला नाही. "भूविकास' चा बोजा साऱ्या जमिनीवर असल्याने मुलांची लग्ने होईनात आणि आता लिलाव करायला निकालेत. जमिनीबरोबर आमचाही लिलाव करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आज भुविकास बॅंकेने थकबाकीदारांना काढलेल्या नोटीसीबाबत आयोजित बैठकीत सोनाळीचे महादेव कोरे यांनी व्यक्त केली. 

कोल्हापूर ः माझ्या नावांवर 72 लाखाचे कर्ज आहे, मात्र शेतात पाण्याचा थेंबही पडलेला नाही. "भूविकास' चा बोजा साऱ्या जमिनीवर असल्याने मुलांची लग्ने होईनात आणि आता लिलाव करायला निकालेत. जमिनीबरोबर आमचाही लिलाव करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आज भुविकास बॅंकेने थकबाकीदारांना काढलेल्या नोटीसीबाबत आयोजित बैठकीत सोनाळीचे महादेव कोरे यांनी व्यक्त केली. 
एखादी बॅंक असवासनायात असल्यास त्या बॅंकेची वसुली करता येत नाही, असा शासनाचा आदेश आहे. तरीही भुविकास बॅंकेसह भुदरगड नागरी पतसंस्थेच्या थकबाकीदारांना वसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहावर कर्जदारांची बैठक झाली. बैठकीला जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, शिवाजीराव परूळेकर व भुविकासचे व्यवस्थापक नाईक उपस्थित होते. 
बॅंक अवसायनात असताना थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून सक्तीने वसुली केली जाते, असे प्रकार घडले तर संबधित कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करा, अशी सूचना श्री. आबीटकर यांनी बॅंक व्यवस्थापनास केली. 
शासनाच्या ऑक्‍टोबर 2020 च्या परिपत्रकानुसार ओटीएस योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना केवळ योजनेत सहभागी होण्याबाबत कळवले आहे, त्यांच्याकडून कर्जवसुलीची सक्ती केलेली नाही, अशी माहिती बॅंकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील यांनी दिली. यावर, अवसायनात बॅंक असताना वसुली कशी करता? असा सवाल करत, शेतकरी अडचणीत आहे. त्याला आधार देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमेबाबतही प्रयत्नशील असल्याचे श्री. आबिटकर यांनी सांगितले. बॅंकेच्या मालमत्तांची विक्री करण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर प्रलंबीत आहे, त्याला गती देण्यासाठी अधिवेशनात विषय लावून धरत मालमत्तांवरील बोजाही कमी करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. कर्ज वसुलीला स्थगिती असताना बेकायदेशीररित्या कर्जवसुली करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी बैठकीत दिले. 

मृत्यूनंतर नावावर कर्ज 
सोनाळी (ता. कागल) येथील नागनाथ पाणीपुरवठा संस्थेचे सभासद बाबूराव गुरव यांचा 1996 ला मृत्यू झाला आणि 1997 साली त्यांच्या नावावर कर्ज टाकले. शेतकऱ्यांनी कर्जापेक्षा पाचपट रक्कम भरली तरी अद्याप थकबाकी कशी? असे समाधान म्हातवडे व सतीश भिऊंगडे यांनी विचारले. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auction us along with the land for the arrears of "Bhuvikas"