
कोल्हापूर : लॉकडाऊन असले तरी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या अजिबात कमी पडणार नाहीत. या वह्या जूनपासून सुरु होणाऱ्या शाळांना भरपूर उपलब्ध होतील. वह्यांची निर्मिती दिवाळी नंतर मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे गतवर्षीच्या वह्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने या वह्या मेपासून बाजारात यायला सुरवात होतात. कोरोनामुळे लॉकडाऊन केले असले तरी, दिड महिना पुढेही शाळा सुरु झाल्यातरी वह्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, असे स्टेशनरी व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी दरवर्षी 25 कोटी वह्या विद्यार्थ्यांना लागतात. या सर्व वह्या स्टेशनरी मार्टस्चे विक्रेते जानेवारीपासून गोडावूनमध्ये भरायल्या सुरवात होतात. वह्यांची निर्मिती ही काही प्रमाणात शहरातील दोन ते तीन उत्पानक करत असले तरी सर्वाधिक वह्या पालघर (जि. ठाणे) येथील उत्पादकांकडून निर्माण केल्या जातात. नंतर एप्रिल-मे मध्ये वह्यांची विक्री सुरु होते. दहावीचे जादा वर्गही सुरु झालेले असतात. यानंतर जूनपासून पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी वह्या विकत घ्यायला सुरवात करतात. 200 पानी वही (नॉर्मल साईज) 20 ते 35 रुपयांना मिळते. यामध्ये साधी वही, स्टॅंडर्ड वही असा फरक असल्याने ही किंमत काहीशी वाढते; पण विद्यार्थी जेव्हा स्टेशनरीमध्ये येतात, तेव्हा स्टॅंडर्ड वहीसाठी अट्टाहास करतात. पालकसुद्धा फारसे आढेवेढे न करता या वह्या विकत घेतात. रेग्युलर नोटबुक, ए फाईव्ह, ए फोर, लॉंग बुक असे वह्यांचे प्रकार असून दु-रेघी, चार रेघी, चौकडा असे वह्यांचे प्रकार आहेत. अलिकडच्या काही वर्षात लहान मुलांसाठी थ्री इन वनमध्येही दुरेघी, चार रेघी, चौकडा असे प्रकार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, खास इंग्लिशसाठी ब्लॉक ही वहीसुद्धा स्टेशनरीमध्ये मिळते. कोरोनाच्या लॉकडाऊनचा काहीही परिणाम वही निर्मिती अन् विक्रीवर जाणवणार नाही.
40 टक्के वह्या विविध शाळांमध्ये घेतल्या जातात. या वह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शाळेमध्ये "सेल' होतो. हा सेल हा "फिक्स' असतो. याशिवाय स्टेशनरीमधून वह्यांची विक्री होतच असते. जरी शाळांतून वह्या घेतल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना अनेकदा जादा वह्या घ्याव्या लागतात. यासाठी हे विद्यार्थी स्टेशनरीमधून वह्या घेतात. ए फाईव्ह, ए फो ही वही सर्वाधिक विक्री होते. मागणीही जास्त असते. मागणीनुसार स्टेशनरी व्यापाऱ्यांना अशा वह्या ठेवाव्या लागतात. वह्यांच्या कव्हरवर कोणती चित्रे आहेत, तेही विद्यार्थी पाहतात. मगच वह्या घेतात. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी दहा टक्के वह्या जास्त लागतील. जिल्ह्यात खासगी, शासकीय शाळांचे प्रमाण खूप असल्याने वह्यांचा खप हा भरपूर होतो. शिवाय, खासगी ट्युशनसाठी ही वही घेतली जाते. म्हणजे, शाळा-कॉलेजमध्ये आणि ट्युशनमध्ये ही वही घ्यावी लागते. आज ऑनलाईन एज्युकेशन ही संकल्पना अस्तित्वात असली तरी प्रत्यक्ष वह्या घेऊन अभ्यास करणे, नोटस् घेण्याचा आनंद हा विद्यार्थ्यांना मिळत असतो.
"ज्या वहीचा कागद, पुठ्ठा, बांधणी मजबुत असते. ही वही वर्षभर खराब होत नाही. अशा वह्यांसाठी विद्यार्थी आग्रही असतात. पालकही विद्यार्थ्यांना जशा वह्या पाहिजेत, तशाच पद्धतीने या वह्या विकत घेतात.''
- पंकज शहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.