महावितरण कार्यालयाला मंगळवारी टाळा

 Avoid MSEDCL office on Tuesday
Avoid MSEDCL office on Tuesday

कोल्हापूर ः राज्यातील घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत व त्या रकमेची भरपाई राज्य शासनाने करावी या मागणीसाठी मंगळवारी (ता. 27) दुपारी 12 वाजता महावितरण कार्यालयास राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन होणार आहे. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल. राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
माजी खासदार राजू शेट्टी, वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबा पार्टे आदी उपस्थित होते. राज्यात जुलैपासून वीज बिल माफीसाठी आंदोलन केली. तथापि सरकारचा प्रतिसाद निराशाजनक आहे. 20 टक्के ते 25 टक्के सवलत देऊ अशी केवळ चर्चा केली. त्यामुळे 3 महिन्यांची वीज बिल माफी झाली पाहिजे, यासाठी पुन्हा आंदोलन होणार आहे. 
लॉकडाऊनमध्ये अनेकांची रोजीरोटीच बंद झाली. यात कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची दमछाक झाली. त्यामुळेच तीन महिन्यांची दरवाढीची वीज बिले आली यातून असंतोष निर्माण झाला. ही बिले भरताच येणार नाहीत अशीच अवस्था बहुतांशी ग्राहकांची आहे. 
केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने लॉकडाउन काळात 50 टक्के ते 100टक्के बिले माफीचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही तसा निर्णय घ्यावा. 
3 महिन्याच्या रकमेची भरपाई रक्कम अंदाजे 4500 कोटी सरकारने महावितरण कंपनीस अनुदान स्वरूपात द्यावेत, तसेच कृषिपंपधारक सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा रु.1.16 प्रतियुनिट दराने बिल देण्याबाबत ऊर्जामंत्र्याबरोबर चर्चा झाली होती त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले दिले होते; मात्र कार्यवाही झाली नाही. त्याचीही आठवण करून दिली जाणार आहे.

अन्यथा पुन्हा आंदोलन 
कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या पेड पेंडिंग कनेक्‍शनबाबत अजून सर्व्हिस कनेक्‍शनचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील 4 लाख तक जिल्ह्यातील 7500 कृषिपंप ग्राहक 5 वर्षांपासून कनेक्‍शनची वाट पाहत आहेत. या सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढावा अन्यथा सर्वपक्षीय संघटना व पक्ष राज्यभर पुन्हा आंदोलन करतील असा इशारा विक्रांत पाटील व श्री. होगाडे यांनी दिला.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com