"थुंकीमुक्त कोल्हापूर'साठी बिंदु चौकात आज गांधीगिरीने जनजागृती

 Awareness on Gandhigiri today at Bindu Chowk for "Spit Free Kolhapur"
Awareness on Gandhigiri today at Bindu Chowk for "Spit Free Kolhapur"
Updated on

कोल्हापूर : गांधी जयंतीचे औचित्य साधून थुंकीमुक्त कोल्हापूर ही चळवळ आणखी व्यापक होत आहे. शुक्रवारी (ता.2) दुपारी 4 वाजता बिंदु चौकात मोहीम राबवली जाणार आहे. 
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या असंख्य समस्या निर्माण करते. कोरोना महामारीत थुंकण्यातून संसर्गाची मोठी भिती आहे. परंतू सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार सर्रास घडतात. दै."सकाळ'ने प्रश्नावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले.त्यांनी 'ऍन्टी स्पीट मुहमेंट' ही थुंकण्या विरोधातील चळवळ उभा केली. या चळवळीने रविवारी कावळा नाका येथे थुंकीमुक्त कोल्हापूर जनजागृती मोहिमेस प्रारंभ केला. या मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर चळवळीने पुढचे पाऊल उचलत गांधी जयंती निमित्त बिंदू चौकात व्यापक जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे. शहर स्वच्छते करिता एकत्र येत, या चळवळीचा एक भाग बनत संधी गांधीगिरी पद्धतीने जनजागृतीसाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे. यावेळी सर्वांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वतःचे सॅनिटायझर बाळगणे आवश्‍यक असल्याची सूचना आयोजकांकडून केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com