फेसबुकवरून मैत्री झाली आणि चुना लावून गेली

राजेश मोरे
मंगळवार, 14 जुलै 2020

पुरुषाप्रमाणे वेशभूषा करून बंटी और बबलीच्या चित्रपटाप्रमाणे फेसबुकवर महिलांशी मैत्री करत गंडा घालणाऱ्या पेईंग गेस्ट महिलेला अखेर करवीर पोलिसांनी जेरबंद केले. स्नेहा सातपुते (सुभाषनगर) असे तिचे नाव आहे. तिच्याविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल होता.

कुडित्रे (कोल्हापूर) ः पुरुषाप्रमाणे वेशभूषा करून बंटी और बबलीच्या चित्रपटाप्रमाणे फेसबुकवर महिलांशी मैत्री करत गंडा घालणाऱ्या पेईंग गेस्ट महिलेला अखेर करवीर पोलिसांनी जेरबंद केले. स्नेहा सातपुते (सुभाषनगर) असे तिचे नाव आहे. तिच्याविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल होता.

रोहिणी होनमोरे (शिंगणापूर) यांच्याकडे स्नेहा पेईंग गेस्ट म्हणून काही दिवसांपासून राहत होती. फिर्यादी होनमोरे यांच्या खात्यातून वेळोवेळी 13 हजार 400 रुपये ट्रांन्स्फर केले. याच बरोबर तिजोरीतील रोख 15 हजार व 22 ग्रॅमच्या 66 हजारांच्या दोन अंगठ्या असा 94 हजार रुपयांचा डल्ला मारला होता. हेडकॉन्स्टेबल भगवान गिरी यांनी शिताफीने महिलेला पकडले. तिच्यावर दुसऱ्याही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून ती सराईत असल्याचे सांगण्यात आले. 

लॉकडाऊनचा फायदा 
रोहिणी होनमोरे व स्नेहा सातपुते फेसबुकवरील मैत्रिणी. स्नेहाने रोहिणी होनमोरे यांना फोन करून मी कोल्हापुरात लॉकडाऊनमुळे अडकलो असून माझी राहण्याची सोय नाही. लॉकडाऊन उठेपर्यंत राहण्याची सोय करा अशी विनंती केली. रोहिणी यांनी स्नेहाला सहानुभूती दाखवत राहायला जागा दिली आणि फेसबुकवरील मैत्री चुना लावून गेली.

संपादन -  रंगराव हिर्डेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Became friends on Facebook and limed