साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या पाठपुराव्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

विषयाची माहिती घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिका कर्मचारी संघाच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज सत्कार करण्यात आला. संघाच्या  साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल कर्मचाऱ्यांनी  मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त  करण्यात आली.

यावेळी कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे असलेल्या ४३७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी  मागणी मंत्री  मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यानंतर या विषयाची माहिती घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा करु, असे  मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा- इचलकरंजीत पालिकेसमोर पेटवून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यु -

कोल्हापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, राजेश लाटकर, विनायक फाळके, महेंद्र चव्हाण या प्रमुखांसह कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वनकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

संपादन - अर्चना बनगे

 

            
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On behalf of Kolhapur Municipal Corporation Employees Union Rural Development Minister Hasan Mushrif was felicitated