बेळगावचा ऑरेंज झोनमध्ये समावेश...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

डीसी बोम्मनहळ्ळींचे स्पष्टीकरण; वाणिज्य, वाहतुकीला सशर्त परवानगी

बेळगाव - केंद्राच्या मार्गसूचीप्रमाणे बेळगाव जिल्ह्याचा समाविष्ट ऑरेंज झोनमध्ये झाल्याचे स्पष्टीकरण बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी आज (ता.3) दिले. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावचा नेमका समाविष्ट कोणत्या श्रेणीत आहे, त्याबाबतचे संभ्रम होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत खुलासा करत बेळगाव ऑरेंज झोनमध्ये असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती दिली.

दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन आज (ता.3) संपणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील कालावधी उद्यापासून (ता.4) जारी होणार आहे. सुधारीत आदेशाप्रमाणे रेड झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे. पण, आरेंज झोनमध्ये दैनंदिन कामकाज, वाणिज्य व्यवहार व वाहतुकीला परवानगी मिळणार नाही. पण, ती सशर्त असेल. केंद्राने मार्गसूची तयार केली आहे. त्यानुसार 4 एप्रिलपासून कार्यवाही सुरु होईल, असे जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले.

वाचा - आम्हाला पाणी द्या ! कर्नाटकची महाराष्ट्राकडे विनंती...

पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी शनिवारी बेळगावचा समाविष्ट ऑरेंज झोनमध्ये असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती दिली. पण, राज्य सरकारतर्फे जाहीर यादीत बेळगावचा समाविष्ट रेड झोनमध्ये आहे. यासाठी जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी आज याबाबत स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार बेळगावात कार्यवाही केली जाईल. पावले उचलण्यात येतील. नियम आणि अटी लागू केल्या जातील. आर्थिक, वाणिज्य विकासाला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येतील. वाहतुकीला सशर्त परवानगी मिळेल, अशी माहिती दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum included in Orange Zone