
कोल्हापूर : कामासाठी सायकल वापरणे हे आता मागे पडले असून फिटनेससाठी सायकलींचे महत्त्व वाढले आहे. स्वतःची फिटनेस राखण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःची रोजची कामे पूर्ण करण्यासाठी सायकलचा वापर होऊ लागला आहे. सायकलमध्ये सध्या अनेक बदल झाले आहेत. इलेक्ट्रिक मोटर असणाऱ्या सायकलमुळे तर दुचाकी गाडीला पर्याय म्हणून ही सायकल समोर आली आहे.
पूर्वी सायकल वापरणे ही चैन असायची, तर कालांतराने त्यात बदल होऊन सर्वाधिक गरजेचे आणि कामासाठी सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून सायकल वापरली जाऊ लागली; मात्र कामापासून ते स्पर्धांपर्यंत या सायकलींचा वापर होऊ लागला आहे. मधल्या काही काळात प्रत्येकाच्या आयुष्यातील ही सायकल बाजूला पडत गेली. एक अडगळीतील वस्तू बनून राहिली होती; मात्र सध्या फिटनेस अवेअरनेस वाढल्यामुळे या सायकलींना पुन्हा सुवर्णकाळ आला आहे. सायकलमध्ये असणाऱ्या गिअरच्या सुविधेमुळे हे अधिक सोयीचे झाले आहे. सोबतच आयर्नमॅनसारख्या जागतिक स्पर्धांमुळे त्या सायकलचे महत्त्व वाढतेच आहे. शिवाय जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर सायकलच्या अनेक स्पर्धा होतात. योग्य सायकल निवडणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यापासून अनेकांनी सायकलिंग हा पर्याय स्वीकारत शेकडो किलोमीटरची रपेट करण्याचा निर्धार केला आहे. यातूनच जोतिबा, पन्हाळा, राष्ट्रीय महामार्ग, राधानगरी, गारगोटी या ठिकाणी अनेक जण सायकलिंगसाठी जात आहेत. सायकलिंगमुळे फिटनेससह शारीरिक क्षमता वाढीचा फायदा असल्यामुळे अनेकांनी सायकल जवळ केली आहे.
विदेशी ब्रॅंड उपलब्ध
कोल्हापूरमध्ये सध्या सायकलचे देशीच नाहीत, तर विदेशी ब्रॅंड उपलब्ध आहेत. जगप्रसिद्ध असणाऱ्या पाच महत्त्वाच्या ब्रॅंड्सनी तर भारतातच या सायकलची निर्मिती सुरू केली आहे. सायकलमुळे आता दिवसभराचे काम करण्यासोबतच फिटनेस राखण्याकडे कल वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक नामवंत कंपन्यांच्या सायकल उपलब्ध आहेत.
कोणत्याही कर्तव्यावर सक्रिय असा, तुम्ही स्वतः तंदुरुस्त असणे गरजेचे असते. सायकलिंगमुळे ऊर्जा मिळते, शिवाय आयुष्यातील प्रत्येक हार-जीत स्वीकारण्याची आणि पुन्हा नव्याने सुरवात करण्याची प्रेरणा यातून मिळते.
- गणेश पाटील, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.