पळा पळा गवा आला, दिवसभर शेतीत आणि रात्री शेतीबाहेर वाढतोय वावर

bison entry in kolhapur yesterday night also enter in city at night in kolhapur
bison entry in kolhapur yesterday night also enter in city at night in kolhapur
Updated on

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा परिसरात चार गव्यांचा कळप आढळून आला आहे. वन विभाग या गव्यांवर लक्ष ठेवून असून, नदी पुलावर वर्दळ वाढल्याने गवे परतू शकलेले नाहीत. ते पहाटेच्या सुमारास परततील, असा वन विभागाचा अंदाज आहे. 
कोल्हापूर शहरालगत गवे आल्याची माहिती काल दुपारीच समजली होती. त्यानुसार वन विभागाचे पथक घटनास्थळी गेले; मात्र प्रत्यक्ष गव्यांचे दर्शन घडले नाही.

पायांच्या ठशावरून गव्यांचा वावर लक्षतीर्थ वसाहत परिसरात असल्याची खात्री वन विभागाला झाली. त्यानंतर गव्यांचा शोध घेणे सुरू झाले. इतक्‍यात सायंकाळी सहानंतर गवे हनुमंतवाडी परिसरात दिसले, असा फोन वन विभागाला आला. त्यानंतर वन विभागाने हनुमंतवाडी येथे गव्यांचा शोध घेतला; मात्र तेथेही गवे दिसले नव्हते; मात्र पायांचे ठसे लक्षतीर्थ वसाहत व सुतारमळा येथेच दिसत असल्याने गवे असल्याची खात्री झाली. यावेळी गवे अवतीभोवतीच्या ऊसशेतीमध्ये गायब झाले आहेत.

सायंकाळनंतर पंचगंगा नदी पुलावरून वाहनांची ये-जा सुरू झाली, त्यामुळे गव्यांना पूल ओलांडून पलीकडे जाता आलेले नाही. हा परिसर पूर्णपणे शांत झाल्यानंतर या भागातून गवे दुसऱ्या बाजूला जातील, असा वन विभागाचा अंदाज आहे. पण हे गवे ऊसशेती सोडून उत्तरेश्वर ते लक्षतीर्थ वसाहत मार्गावरून नागरी वस्तीकडे येऊ नयेत, यासाठी वन विभाग येथे गस्त घालत आहे. त्यासाठी वन विभागाची दोन पथके लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा तसेच हनुमंतवाडी परिसरात तैनात झाली आहेत.

मागील वर्षीही याच परिसरात दर्शन 

मागील वर्षी कोल्हापुरात याच परिसरात चार गव्यांचे दर्शन झाले होते. सलग दोन दिवस गव्यांचा मुक्काम याच भागात होता. त्यातील दोन गवे अगदी शहरालगत नागाळा पार्क येथील एका पेट्रोल पंपाजवळच्या शेतात आले होते. वन विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. दिवसभर शेतीत व रात्री शेतीबाहेर, असा गव्यांचा वावर राहिला. अखेर तीन दिवसांनंतर गवे जोतिबा डोंगराच्या दिशेने परतले. तेव्हा वन विभागाने या भागात लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली, त्यामुळे गव्यांची पळापळ न होता ते आल्या मार्गाने शांतपणे परतले. याच घटनेची आठवण एकाच वेळी चार गवे आल्याने पुन्हा एकदा झाली आहे.

"गवे नागरी वसाहतीकडे येऊ नयेत तसेच लोकांची गर्दी होऊ नये व गव्यांची दमछाक होऊ नये, यासाठी वन विभाग दक्ष आहे."  

- विजय पाटील, वनपाल

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com