
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आघाडी सरकारसह काॅंग्रेस नेतृत्वावरही टीका केली
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच शरद परवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिणीला मुलाखत देताना त्यांनी एकीकडे शरद पवार यांचे कौतुक केले तर दुसरीकडे मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टीकाही केली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आघाडी सरकारसह काॅंग्रेस नेतृत्वावरही टीका केली. तरूण कार्यकर्त्यांना काॅंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही हे काॅंग्रेसने मान्य करावे आणि काॅंग्रेसला लोक टिकवून ठेवता येत नाहीत असा टोलाही पाटील यांनी लगावला. याबरोबरच सध्या राज्यात गाजत असलेल्या वीज बीलावरही पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकामध्ये कोणत्याच कामावरून समन्वय नाही. एकाच विषयावर दोन मंत्री वेगवेगळे वक्तव्य करत असतात असे सांगत वीज बील भरले नाही म्हणून शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नये असे आवानही पाटील यांनी यावेळी केले.
हे पण वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेवरून खेचण्यासाठी व्यूहरचना
उध्दव ठाकरेंवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चांगली जाण आहे, हे सांगतानाच पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे यांना मंत्रालय कुठं होत हे पण माहित नव्हतं, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अभ्यास वाढविण्याची गरज असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
शरद पवारांच्या वारसावरून गुगली
यावेळी आमदार पाटील यांनी शरद पवारांचा राजकीय वारसा कोण असणार यावर गुगली टाकत भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास शरद पवार अजित पवार यांच्याएेवजी सुप्रिया सुळे यांनाच परंती देतील असा विश्वास व्यक केला.