शरद पवार यांच्या प्लसमध्ये जाण्यासाठी मुश्रीफ टीका करतात ; चंद्रकांत पाटील यांचा टोला   

bjp leader chandrakant patil criticism on hasan mushrif
bjp leader chandrakant patil criticism on hasan mushrif
Updated on

कोल्हापूर - जगात मी कुठेही बोललो तरी जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना बोलावेच लागते. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शेतकरी कायद्यावरून मी पंतप्रधान आहे का, अशी विचारणा केली आहे. मात्र, मी पंतप्रधान आहे की सामान्य शेतकरी, हे मुश्रीफांनी सांगण्याची गरज नाही. केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्लसमध्ये जाण्यासाठी मुश्रीफ माझ्या वक्‍तव्यावर टीका करतात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. विविध शेतकरी संघटनांनीही कायद्यांचे स्वागत केले आहे. बाजार समितीची रचना नष्ट न करता बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसारच हे कायदे केले. मी पणन मंत्री असतानाही समितीबाहेर माल विक्रीस परवानगी दिली. या विरोधात बाजार बंद होते; मात्र माघार घेतली नाही. याचा शेतकऱ्यांना फायदाच झाला.’’

हे सेसचे राजकारण
पंजाबमध्ये शेतकरी उत्पन्न बाजार समितीत आठ टक्‍के सेस द्यावा लागतो. मार्केट बाहेर विकले तर हा सेस बुडणार आहे. त्यामुळे हे सेसचे राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार काही बदल करण्यास तयार आहे. आता एमएसपीची तरतूद कायद्यात करण्याचे मान्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करण्यास केंद्र सरकार तयार आहे; मात्र काही लोकांची मध्यस्ती,  दलाली संपणार असल्याने कायद्यांना विरोध होत असल्याचे पाटील 
यांनी सांगितले.

तुमचे राजकारण हवाई
शेतकरी हिताचे कायदे असतील तर ते शेतकऱ्याला बांधावर जाऊन सांगा, असे वक्‍तव्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. मात्र, त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत. समरजितसिंह घाटगे बांधावर जाऊन जेवत आहेत. ‘पाटीलसाहेब, तुमचे राजकारण हवाई आहे’, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com