esakal | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गडहिंग्लजला भाजपची निदर्शने

बोलून बातमी शोधा

BJP's Agitation For Resignation Of Home Minister Kolhapur Marathi News

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वसुलीमंत्री आहेत. त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपने आज निदर्शने केली.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गडहिंग्लजला भाजपची निदर्शने
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वसुलीमंत्री आहेत. त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपने आज निदर्शने केली. येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजपने आज आंदोलन करीत सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला. दुपारी बाराच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते दसरा चौकात जमले. शासनाचा निषेध केला. वसुलीमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे..., तीन तिघाडी काम बिघाडी.., राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा... आदी घोषणा देण्यात आल्या. 

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर व अशोभनीय आले. राज्यात जनतेचा घात केला आहे. भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनामी होत आहे. पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन ईडीतर्फे चौकशी करावी. अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. 

तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, पंचायत समिती सदस्या जयश्री तेली, मारुती राक्षे, चंद्रकांत सावंत, प्रितम कापसे, सुभाष चोथे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, बेनिता डायस, कुमार पाटील, भिकाजी पाटील, अशिष साखरे, संदीप रोटे, आकाश दळवी, शामराव नाईक, राकेश शेलार, शंकर स्वामी यांच्यासह कार्यकर्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur